Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री अण्णासाहेब यांचें देवदर्शन. राख आहे,' असे सांगितले होतें. तेव्हां तेवढ्यावरून हा ग्रंथ महाराजांचा नव्हे, असें म्हणतां येत नाही. अर्थासंबंधानें व पारिभाषिकसंबंधानेही असेच आहे. एवढें खरें की, या ग्रंथाचा अर्थ सांगणारा कोणीच नसल्यामुळे त्याच्या लाखांची राख झाली असती, परंतु सुदैवानें अण्णासाहेब यांनी ती अडचण दूर केली असल्यामुळे, तो आतां सांप्रयदायिक लोकांच्या उपयोगास स्वाध्याय व बोध अशा दोन्ही रीतीनें उपयोगी पडूं शकेल. त्यांतील शब्दांचा यौगिक- पणा विशिष्ट शब्दांची परिभाषा, उपनिषदांशी त्याचें असलेले सौहार्द, इत्यादि गोष्टी सविस्तर नाहीत तरी, त्यांची मोड कळून बुद्धीची वाटचाली करण्या- पुरत्या अण्णासाहेब यांनी सांगून ठेवल्या असल्यामुळे सांप्रदायिका लोकांचा जो कांही फायदा झाला आहे, तो सांगतां येत नाहीं. असो. या दोन ग्रंथांना धरूनच बहुतेक सर्व त्यांचे बोलणें असें. अशा रीतीनें सर्व कार्यक्रम झाला म्हणजे देवदर्शन निधे. काशीकरांचा विष्णु, श्रीगुंडगणपती, कसब्याचा गणपति, जोगेश्वरी, भिकारदासचा मारुति, शनवारचा मारुति, आणि ओंकारेश्वर, हे बहुतकरून त्यांच्या नित्यांतले होते. याशिवाय काही निमित्तानें इतर देवांसही जात. गणपतीला प्रदक्षिणा घालण्याचा तर हिशोबच नव्हता. एकदां प्रदक्षिणा घालूं लागले म्हणजे चांगल्या ताकदवान् माणसाचीही मात्रा चालत नसे. शेवटीं थकून बरोबरच्या लोकांनी बसून रहावें, व मग यांनी आपल्या प्रदक्षिणा संपल्यावर त्यांस उठवावे, असे होई. देवाच्या दर्श- नास जावयाचें म्हणजे मुद्दाम दर्शनाकरितांच जावयाचें, असा त्यांचा स्वभाव होता. वेळेस देवदर्शनांत दुसरी कामें उरकीत. परंतु दुसऱ्या कामास अगदर्दी शेजारीं गेले असले तरी, त्यांतच दर्शन घेऊन कधीं आले नाहीत. घरी परत येऊन पुन्हा दर्शनास जात. त्याचप्रमाणे दोन दोन दिवस देवदर्शनास सवड न झाली, तर ती शिल्लक बाकी हिशेवानें एक दिवसच भरून काढीत; म्हणजे एक चक्कर संपवून घरीं यावें, व गणपतीचें दर्शन घेऊन पुन्हां दुसऱ्या चक्क- रास जावें, अर्से चाले ! जातांना रिक्तहस्तानें जाऊं नये म्हणून खिशांत पुष्कळसे तांदूळ टाकून नेण्याची त्यांना संवय होती. अलीकडे त्यांचेवरोबर घरचीं दोनचार मुलें व बाहेरचें कोणीतरी, असा थोडासा परिवार, व एकादा कंदील बिंदील असे. परंतु पूर्वी ज्यावेळेस एकटे दुकटेच हिंडत असत, त्यावेळेला, धिप्पाड शरीर,