Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

C , साक्षात्परिचय ' २३६ आपला या ग्रंथांतून आधार काढून द्यावा. त्यांना काय सांगावयाचें तें सांगून ‘ महाराजांनीं नाही म्हटलें ? ' असे म्हणून ते या ग्रंथापैकी एकादी सूत्रभूत ओंवी, शब्द, अथवा काम पडल्यास अक्षरही म्हणून दाखवीत. श्रीगुरुचरित्र हा ज्याच्यांत अवैदिक भाषेचा एकही शब्द नाहीं, असा पहिलाच मराठी ग्रंथ म्हणून त्याचा त्यांना फारच अभिमान वाटे. स्वात्मसौख्याविषयींही त्यांचा आदर असाच विलक्षण होता. स्वात्मसौख्य हा ग्रंथ श्रीमहाराजांनी सांगितला, व तो कोणा नारायण- स्वामीनी उतरून घेतला. ही गोष्ट. केव्हां तरी श्रीनृसिंहसरस्वती यांची जन्मभूमि जें करंजनगर ( म्हणजे वहाडांतील कारंजें ) त्या ठिकाणी घडली. या पलीकडे त्याची दुसरी कांहींच माहिती नसल्यामुळे, आणि महाराजांच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणे, ज्यांच्याजवळ तो ग्रंथ होता, त्यांना स्वतः महाराज शांत होईपर्यंत, तो ग्रंथ बाहेर काढण्याची त्यांनी वंदी केली असल्यामुळे, या ग्रंथाविषयीं सांप्रदायिकांतही कित्येक हा ग्रंथ महाराजांनी केलेला आहे किंवा नाही, असे म्हणणारे आहेत. आणि त्याची दुसरींही दोन तीन कारणे आहेत. एकतर, ह्या ग्रंथाची भाषा अगदीं स्वतंत्रपद्धतीची आणि पारिभाषिक असल्या- मुळे आणि यांतील शब्दांचा उपयोग रूढार्थापेक्षां वेदवाणीप्रमाणे यौगिकच जास्त असल्यामुळे त्याची मोड कळल्याखेरीज एक अक्षरही समजणें दुरापास्त आहे. त्यामुळे वाचणारास कांहीं न कळून 'महाराज असे अर्थशून्य कांहीं कसे लिहितील ? ' असे वाटून तो ग्रंथ महाराजांचा नसेल अशी शंका येते. दुसरें अर्से की, त्यांत लेखक आणि वक्ता यांना उद्देशून कृष्णचैतन्य, कृष्णानंद, निरंजन, रामचंद्र इत्यादि शब्द कांहीं विशेष अर्थाने वापरले आहेत. त्याची परिभाषा न समजल्यामुळेही असे वाटतें, आणि कोणी कोणी तर असेही म्हण- तात की हा ग्रंथ जर महाराजांचा असता, तर तो बुवासाहेबांचे पाठांत खास आला असता. परंतु ह्या म्हणण्यांत कांहीच अर्थ नाहीं. हा ग्रंथ बुवा- साहेबांच्या नित्यपाठांत नव्हता, अथवा त्यांच्या तोंडूनही याचा कधीं उल्लेख कोणी ऐकला नाहीं, तरी एवढें खरें की त्यांना हा ग्रंथ माहीत होता, इतकेंच नाही, तर या ग्रंथांतील मुख्य रहस्यभूत जी ओवी अण्णासाहेब सांगत असत, तीच ओवी त्यांनीही रा. गंगाधरपंत आंबडेकर ऊर्फ महंत, दाखवून ‘ काय लाख किंमतीची ओवी आहे | परंतु विषयीं जीवांना काय, यांना म्हणून (