पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीगुरुचरित्र व स्वात्मसौख्य. २३५ लपणानें मान देत, व तसाच ती० स्व० गं. भा. काकूंनाही देत. त्यांच्या- वरच ही पाळी येत असे. 'आतां थोडें काहींतरी खा' असे त्यांनी म्हटले. की पहिल्यांदा यांनी अगदी चिडून जावयाचें व 'अहो काकू, खाण्याकरतां का माझा जन्म आहे ? ' असे म्हणावयाचें. तरीही रागरंग पाहून काकू आग्रह केल्याखेरीज राहात नसत, व त्यांच्या म्हणण्यास मान देऊन आपल्या आह्नि- काच्या तानमानाप्रमाणे अण्णासाहेब थोडेबहुत तोंडांत टाकीत. तरी पण नीट पान मांडून फराळ करावयाचा प्रसंग सारें आहिक आटोपले म्हणजेच २।४ दिवसांनी केव्हांतरी येईं ! पडल्यावर या आकांतला अलीकडील मोठा भाग म्हणजे श्रीगुरुचरित्र आणि देव- दर्शन. अण्णासाहेब यांच्या नित्यक्रमांत नाथभागवत आणि ज्ञानमोदक हे दोन ग्रंथ पूर्वीपासूनच होते. स्वात्मसौख्याची भर त्यांत मागाहून पडली. व त्यांच्या जोडीस श्रीगुरुचरित्रही सहज येऊन बसले. ती० स्व० गं. भा. गयाताईंना श्रीगुरुचरित्र ऐकावयाचे असे, त्या निमित्तानें हा ग्रंथ अण्णासाहेब यांनी सहज आणला. आणि एकदां त्या निमित्तानें तो त्यांच्या हातांत यांच्या पद्धतीप्रमाणें यांनी त्याचा इतका पिठ्ठया पाडला की पुढे पुढे तर, सारा वाडाच तिन्ही त्रिकाळ श्रीगुरुचरित्र बोलूं लागला, आणि अण्णासाहेब म्हणजे श्रीगुरुचरित्र आणि श्रीगुरुचरित्र म्हणजे अण्णासाहेब अशी दोघांची सांगड घालण्यांत येऊं लागली. स्वतः पारायणें करून व इतरांकडून* पारायणें सप्ताह वगैरे ऐकून त्यांनी हा ग्रंथ व त्याच्या जोडीस स्वात्मसौख्य हैं इतकें आत्मसात् करून टाकले की या ग्रंथांतील अक्षर ना अक्षर त्यांच्यापाशी आपले रहस्य ओकूं लागले. कोणच्याही प्रसं- गावर बोलणें असो, आणि कशाही तऱ्हेची शंका असो, अण्णासाहेबांनी

  • या कामीं विशेषतः रा. रा. काशिनाथपंत वागदरीकर ऊर्फ बारिक

मास्तर यांची चिकाटी खरोखरच विलक्षण होती. स्वतःचा संसार व नौकरी सांभाळून आणि नानासाहेब यांच्या दांडग्या विरोधास मुकाट्यानें टाकून अण्णासाहेब यांच्या धोरणाने वेळीं अवेळी पोथी वाचण्याचें व्रत त्यांनी मोठ्या नेटानें केलें. यांनी शुद्ध केलेल्या पाठांचेएक श्रीगुरूचरित्रही बेळगांवच्या 'रामतत्त्व ' छापखान्याने प्रसिद्ध केले आहे.