पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ साक्षात्परिचय ' म्हणत असतां आपली लंगोटी गळून गेली आहे, ही गोष्टही त्यांच्या गावी नसे. परंतु अशा वेळीं म्हणजे ते कांहीं एकाया अतिमानुषभावांत असत असेंही नाही, कारण त्याच वेळेला आपले म्हणणें व त्यावरोवरच मुंग्यांची लढाई अथवा कोंबड्याचें विशेष ओरडणे इकडेही त्यांचे लक्ष असे; तथापि आपल्याला शरीर आहे, व त्याच्या द्वारे आपले व्यवहार होतात, यांची जाणीव अगदी लहान पोराप्रमाणेंच त्यांच्या ठिकाणी दिसत नसे. कित्येक वेळां असे होई की, आपण एकादी गोष्ट त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा, परंतु असे आढळून येई की कांहीं केल्या तें त्यांच्या डोक्यांत शिरतच नाही, आणि ती गोष्ट इतकी साधी असे की आपल्यालाच मोठे आश्चर्य वाटे. अशा वेळीं ऐकण्याकडे त्यांचे दुर्लक्ष असे, असेही नाही. अशा कांहीं गोष्टी तर कोणालाही हसूं आणतील. एका गृहस्थास आळंदीहून यावयास उशीर लागला. त्याची चौकशी करतां त्यानें असें सांगितलें 'वाटेंत सायकल पंक्चर झाली म्हणून वेळ मोडला. ' तेव्हां हे त्याला म्हणूं लागले ' पंक्चर झाली तर काय झालें ? चाकें तर तशींच होती ना ? तसेच वसून यावयाचें होतें, थोडा वेळ लागला असता !' अशा गमती पुष्कळ वेळां घडत. एकाद्या कामास लागले, अथवा कोणाशी बोलू लागले म्हणजे पुष्कळ वेळां असें होई की त्यांना लध्वीस लागे, परंतु 'आतां जाऊं' मग जाऊं ' ' एवढे बोलणें आटपलें कीं जाऊं,' असे करतां करतां पांच पांच तास निघून जात ! मग शरीरधर्म अनावर झाला म्हणजे, एकाद्या दोन वर्षाच्या पोराप्रमाणें हातानें लध्वी दाबीत धांवपळ करीत गच्चीवर जातांना त्यांना पाहिले म्हणजे पाह- णाऱ्याच्या मनांत, प्रेम, कौतुक, आश्चर्य आणि आदर असे सारे विकार क्षण- मात्र गर्दी करीत. असो. अशा रीतीनें त्यांचे आह्निक संपलें म्हणजे मग जठराग्नीस समिध द्यावयाची त्यांना आठवण होई, व मग तो विधाही अतिशय संतोषानें होई. मध्यंतरीं जर कधीं कोणी कांहीं खावयाची गोष्ट काढली तर ते अतिशय चिडून जात. आणि अलीकडे अलीकडे तर त्यांचें दिनमान लांबतच चालल्यामुळे जवळच्या माणसास तसें म्हणण्याचा वारंवार प्रसंग येई. महाराजांचा नैवेद्य तशाच सत्पात्र हातून व्हावा, म्हणून त्यांनी श्रीभक्त माधवराव दांडेकर यांचे कुटुं- बास मुद्दाम जवळ ठेऊन घेतले होतें, श्रीभक्त दादा दांडेकर यांस ते वडी- V