Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋणत्रयाचा मार्ग. २१३ असते, तरी त्या मानसिक स्मरणाच्या बुडाशीं सुरुंग लावल्याप्रमाणे कांहीं तरी ' प्रतिप्रसव ' प्रवृत्ति पेटत असते. म्हणून दोघांच्या फलांत फरक पडला. माणसाची स्थिति नेहमी लहान मुलासारखी असते. कोणी खावयास बसलें, कीं हे शिष्ट जवळ येऊन उभे राहतात, व मोठ्या संभावितपणानें म्हणतात, ' मी कांहीं मागत नाहीं, मागूं नये, कोणी दिले तर घ्यावें.' पोटांतील हेतु असा की खाणाराच्या ताटांतील गोड घांस आपणास मिळावा. तसेंच सामा- न्यतः मनुष्याच्या अभ्यासवैराग्याचें असतें. पुत्रसुखाची 6 अथवा त्याहीपेक्षां चांगले उदाहरण म्हणजे मुलगा जगून पूर्ण प्राप्ती व्हावी, म्हणून हा मुलगा माझा नाही, देवा तुझा आहे, ' असे म्हणून देवास वाहतात, त्याचें आहे. सारांश इतकाच की ही सर्व वस्तुस्थिति ध्यानांत घेऊनच वेदानें मनुष्यांना धर्मार्थ काम---मोक्ष अशी प्रणालिका लावून दिली, आणि तेवढ्या- करितां उघड ' जीवाम शरदः शतम् १ 6 । भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवाः ‘‘ माध्वीर्गावो भवंतु नः 'स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः " मधुनक्तमुतोषसि " अथवा 'आयुः पृथिव्यां द्रविणं ब्रह्मवर्चसम् ' असे मागावयास शिकविलें. आणि 'ऋणानि त्रीनपाकृत्य मनो मोक्षे निवेशयेत् । अनपाकृत्य मोक्षं तु सेवमानो व्रजत्यधः । असें मानवधर्मशास्त्र लावून दिलें. आतां ही गोष्ट खरी कीं, देशकाल परिस्थित्यनुरूप या ऋणांचा बोजा कमीजास्त राहील, व तीं फेडण्याच्या विर्धीतहि फरक पडेल, परंतु सरसहा सर्व लोकांकरितां मार्ग हाच. तेव्हां आपल्या भोंवतांलील लोकांनी याच मार्गाने जावें, अशी त्यांची शिक्षा होती. , एकदां त्यांना महाराजांच्या जवळ कांही मागावें कीं नाहीं, असा कांहीं प्रश्न केला होता; तेव्हां 'हो हो तर, महाराजांच्या जवळच मागावें, आणि काय वाटेल तें मागावें, मात्र ते त्यांच्या जवळूनच घ्यावें, म्हणजे ते देतातही, आणि त्याचा सर्व तऱ्हेनें निर्वाह करून त्यांतून काढतातही. ' असे त्यांनी सांगितले. आणि एवढ्याचकरितां आपल्या भोवती असलेल्या लहानमोठ्या वयाच्या व कमीअधिक अधिकारांच्या जीवांच्या अंतःप्रवृत्तींची वाढ त्यांच्या त्यांच्या वयाला आणि अधिकाराला अनुरूप अशी जोमदारपणे व्हावी, व त्यां- तून निघण्याचा मार्ग त्यांना लागावा त्यांनी निरुत्साह, नीरस, व शेळपट बनूं .