Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ साक्षात्परिचय ' नये, इतकेंच तर काय, तर उलट हौसी, साक्षेपी, व रसज्ञ व्हावें, अशीच त्यांची इच्छा असे. आणि म्हणून ते इतक्या बारीकसारीक गोष्टींपासूनही आपल्या वागण्यानें धडे देत. 6 गोष्ट करावयाची म्हणजे ती लौकिक असो, अथवा पारमार्थिक असो, ती मन लावून यथासांग करावी. उगीच कशी तरी करावी, असे त्यांना कधीं आवडलें नाही. एका गृहस्थानें एकदां त्यांच्याकरितां कॉफी पाठविली. ती तयार करून देणाराला सराव नसल्यामुळे साधत नसे. परंतु त्या पेयाची लज्जत ठाऊक नसल्यामुळे जी काय होई, तीच त्याला चांगली वाटत असे. त्यांना कॉफी दिल्याबरोवर त्यांनी सांगितले की, ‘ कॉफीची खरी चव काय आहे, हेच तुला माहीत नाहीं, ' इतकें बोलूनच ते राहिले नाहीत, तर त्याला हाताशी घेऊन लागलीच त्यांनी स्वतः काफी करून दाखविली. असेच एकदां, गाणें शिकण्याची लहर येऊन एक जण गवईबावापाशीं शिकावयास बसले. खोलीची दारें वगैरे लावून यांना ऐकूं जाऊं नये, असा बंदोबस्त केला होता, परंतु तो कोठून जमणार ? त्यांची इंद्रियें फारच तिखट लागलेंच ते तेथें आले, व सारा प्रकार त्यांनी पाहिला. परंतु थट्टा न करतांना त्यांनी मोठ्या गंभीरपणानें 'याला तुम्ही पहिल्यांदा वीणा लावावयास शिकवा, गाणे शिकावयाचे म्हणजे, आधीं तार लावतां आली पाहिजे, ' असें गवईबोवांस म्हणून त्यांनी त्या विषयाची थोडक्यांत माहिती सांगितली. अगदी खेळण्यासारख्या पोरकट गोष्टीपासूनही ते पराकाष्ठेची हौस दाखवीत, व गमतीदार गोष्टी सांगत. फक्त एका गोष्टीस प्रोत्साहन ते कर्धी देत नसत. आणि ती गोष्ट म्हणजे शुष्क वादविवाद. वादविवाद करतांना बहुतकरून शब्दांचे घोटाळे होतात, आणि उगीच काथ्याकूट होतो. एवढ्याकरितां वाद जर करावयाचाच असला, तर लेखी करावा, म्हणजे त्यांत वादभूत विषयाची परिभाषा निश्चित होते, आणि उगीच गोंधळ होत नाहीं. त्याचप्रमाणे वादाचा विषय काय, आणि तो कोणच्या प्रमाणांनी सिद्ध करावयाचा, म्हणजे त्यांत अनुमान, शब्द, आप्त वगैरे प्रमाणांना किती व कशा तऱ्हेचे महत्त्व द्यावयाचें, आणि तसें तें द्यावयाचें ठरल्यावर, कोणकोणचे ग्रंथ अथवा त्यांतील कशा तऱ्हेचीं वचनें प्रमाणभूत मानावयाची, वगैरे सान्या गोष्टी आर्धी निश्चित