पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ साक्षात्परिचय ' कालत्रयीही शक्य नाही. अशा स्थितीत, वेदांताचे थोड़ें आकलन बुद्धीस झालें, अथवा जास्त अधिकारी पुरुषांचा, किंवा त्यांच्या अनुकरणानें परमा- र्थाच्या शाळा चालविणाऱ्यांचा थोडासा सहवास झाला की तेवढ्यानें झिंगून जाऊन सर्व मानवी प्रवृत्ति ही ईश्वरदत्त सकारण सामग्री आहे, व तिची कर्म- कुशलतेनेंच वाट लावावयाची आहे, असे म्हणणें देखील कमीपणाचें वाटू लागतें, मग तसें वागणे लाजिरवाणे वाटेल, अथवा वागणारा तुच्छ वाटू लागेल, यांत कांही नवल नाही. एकदां असे झाले, म्हणजे निर्भयपणानें व युक्तीनें या सामग्रीचा उपयोग करून घेत मार्ग क्रमण्याचे आवडेनासें होतें, आणि अण्णासाहेब यांच्याच भाषेत बोलावयाचें' म्हणजे, ' मनुष्य एकदम शुक वामदेव व्हावयास पहातो.' आणि कांही काळ तसा ' मिथ्याचार' जरी घडला तरी अखेरीस तें रेटण्याची ताकद नसल्यामुळे म्हाताऱ्या नवऱ्याच्या तिसऱ्या बायकोप्रमाणे घेतलेला मार्गच अखेरीस बोकांडी बसतो, आणि सान्या आयुष्याची एक नक्कलच होऊन जाते. ही गोष्ट मनावर ठसविण्याचा त्यांचा कटाक्ष होता. शंका येईल की, या या आमच्या विवेचनावरही अशी एक ' मिथ्याचार' शब्दास तुम्ही फार उचलून धरिलें, परंतु गीतेंतील. ' मिथ्याचार ' शब्द पाहिला म्हणजे सिद्ध कोटीतील कोणा व्यक्तींचा व्यवहार सोडला तर, सत्याचार कोणास शक्य आहे ? खुद्द मनोनाश करण्याकरितां भगवंतांनी सांगितलेले ‘अभ्यास' आणि 'वैराग्य' हे तरी मिथ्याचारच आहेत. मनःप्रवृत्ति एक असतां ' प्रतिप्रसव' संस्कारांनी तिचा ओघ वळवून शनैः शनैः मनास जिंकण्याचा अभ्यास म्हणजे तरी मिथ्याचारच आहे. परंतु ही शंका योग्य नाही; कारण ' कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इंद्रियार्थान् ' अशी मिथ्याचाराची भगवंतांनी व्याख्या सांगितली आहे. आणि त्याला ' विमूढता' असे म्हटले आहे. कारण तेथें अंतःप्रवृत्तीच इंद्रियार्थांची असते. तेव्हां अखेरीला त्यांतून या नाहीं त्या रीतीनें तरी, व आज नाही उद्यां तरी इंद्रियार्थाचाच कोंभ बाहेर यावयाचा. असे असतांना ' मिथ्याचारा'नें तो बाभळीच्या झाडास बोरी आणण्याची उमेद बाळगतो, तेव्हां त्याला 'विमू- ढात्म ' कसें म्हणूं नये ? परंतु अभ्यासाची गोष्ट अशी नाहीं. तेथें कांहीं काळ जरी ' कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् ' अशी स्थिति 6