Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिथ्याचार. २११ मातीमोल होऊन द्वेषादिक आगींनी समाज धुमसत राहतो. Plain living, high thinking च्या ऐवजी Low living_ high talking मात्र वाढलें. व जिकडे तिकडे मिथ्याचार म्हणजे Hypocracy चें साम्राज्य झाले. उदाहरणार्थ:- पूर्वीच्या काळी एकाद्या धडधाकट माणसास अनावर वृत्ति असल्यास तो खुशाल ऐपतीप्रमाणे एकादी रक्षा ठेवीत असे. आणि ती गोष्ट जरी आदरणीय अशी केव्हांही समजली गेली नाहीं, तरीही तिच्यामुळे त्याचा सामाजिक दर्जा यत्किंचितही कमी होत नसे, व त्याचीही मनाची ताकद अशी रहात असे कीं इतरांनी आपल्या आयाबहिणी निर्धास्त- पणे त्याच्या स्वाधीन कराव्या. आतां त्याच्या अगदी उलट स्थिति झाली आहे. एकादी स्त्री जरा रस्त्यांतून फटकू फटक् करीत चालली, तर तिला पाहण्याकरतां पन्नास अंतःकरणे वेगानें धांव घेतील; परंतु, त्याच- वेळेला नीतिशास्त्राच्या मोठाल्या गप्पा मारून दुसऱ्याचा उपहास करण्यास कमी करणार नाहीत. आंधारांत वाटेल ते करावयास वेगुमानपणे तयार होऊन पुन्हा शिष्टपणानें दुसन्या लोकांस खाली पाडण्यास आमची केव्हाही तयारी असते. याच्यामुळे होतें काय, व्यक्तीचा सर्व जोर आपला आर्थिक, नैतिक, धार्मिक असा निरनिराळ्या तऱ्हेचा सामाजिक दर्जा सांभाळण्यांतच खर्च होऊन जातो, आणि तिच्या कर्तृत्वाला वाव असा सांपडतच नाहीं. मत्सरामुळे गुणग्राहकतेचा लेशही राहिलेला नाही. अशा स्थितीत जे काय थोडें बहुत चांगले अंगीं असेल, अथवा हातून घडण्याचा प्रयत्न होत असेल, त्याला प्रोत्साहन मिळत नाही, उलट स्वाभाविक रीतीनें एकादा मानवी दोष थोडासा जरी दिसला, तर तेवढ्याकरितां, लोकांतून उठल्यासारखें होऊन जाते. अशामुळे समाजाची सडल्यासारखी स्थिति होते. आणि तशांतच निरभिमानता, औदार्य इत्यादि- कांच्या ढोंगाखाली या 'मिथ्याचारा'च्या समर्थन करण्याच्या प्रवृत्तीमुळे ही घाण निघून जाण्याचा मार्गही बंद होतो. हैं विषयांतर जरी सोडून दिलें तरी सारांश एवढाच कीं, मनुष्य म्हटला की त्याच्या ठिकाणी जे सहज घर्म असावयाचे, ते निग्रहानें मारून टाकून त्यांच्या पलीकडे जावयाचें क्वचित् कोणा पुण्यश्लोकास जरी साधत असले, तरी असा मनुष्य खरोखरच अनामिका सार्थ करणाराच असावयाचा, बाकी आमच्यासारख्या ‘ येरांना ' ही गोष्ट