पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१० 'साक्षात्परिचय ' परमात्म्यानें ठेविल्या आहेत, त्या किती जरी वाईट दिसल्या, तरी त्यांत त्याचा कांहींतरी हेतु असला पाहिजे; आणि त्या हेतूप्रमाणे त्या शक्तींचें कार्य घडून आल्याखेरीज त्यांच्या बंधनांतून मनुष्य आपली सुटका केवळ निग्रहाच्या ऐटीनें करून घेऊं शकेल, हे अशक्य आहे. तोर्फेत भरलेल्या बाराची जरी स्वतः तोफेला गरज नसते, अथवा तो जर नीट उडाला नाही तर, तोफ फोडून तिचेच तुकडे करतो, तरी सेनापतीस त्याची गरज असते. तशीच ही स्थिति आहे. या मनःप्रवृत्ति जरी किरकोळ दिसल्या तरी वस्तुतः त्या भयंकर स्फोटकशक्ति आहेत, आणि जरी त्यांची जीवाच्या वाढीस आवश्यकता आहे असें दिसलें नाहीं, तरी बाहेरील विश्वांत त्यांचें कांहीतरी कार्य असतें हैं खास. म्हणून मैत्री, करुणा, मुदिता, इत्यादि शुद्ध सात्त्विक तर काय, पण रोग, द्वेष, अभिमान, मीतूंपणा, क्रौर्य वगैरे राजसी आणि अतितामसी वृत्तींचाही तिरस्कार न करता त्यांचे इष्ट प्रमाणांत पोषण होऊन विश्वांतील कार्य तर घडून यावें, परंतु त्यांनी जीवाच्या वाढीस वस्तुतः अडथळा करूं नये, अशा खुबीने वेदांनी त्यांचा निर्वाह केला आहे. मनुष्याचें मनुष्यपण या सर्व शक्तींच्या कमीअधिक मिश्रणांतच आहे. व तशी त्यांची वाढ न झाली तर, मनुष्य अपंग व विकल होतो. सर्व धर्मानीं, आणि भागवत धर्मानेंही है रहस्य ओळखून या साऱ्या प्रवृत्तींचे पोषण होऊन त्या टाकल्या जाव्या, अशीच धाटी घालून दिली. आणि एवढ्याचकरितां, एका वाजूनें निर्वासन स्थितीचे ध्येय पुढे ठेवून वेदानें जीवास ईश्वराजवळ ‘हें दे, ते दे, ' असे मागावयास शिकविलें. अगदी अलीकडे कलिकालांतील भावष्यत् वेद करणारे श्रीतुकाराम महाराज यांनी देखील " त्यजिले आणुनी भेट्टनी वासना । दाविल्याचें जना काय काज ॥ देवाचिये चार्डे आळवावें देवा । " असेंच शिकविलें आहे. सारांश काय, कीं अलीकडे निष्कामकर्माचा आणि मनुष्यास साहजिक असलेल्या, इतकेंच नव्हे तर अवश्य असलेल्या सर्व प्रवृत्तींचा, परस्परांचे ठिकाणी उपहास करण्याचा जो ' मिथ्याचार उत्पन्न झाला आहे, तसें कोठें भागवत धर्माचें, गीतेचें अथवा वेदाचेंही नाहीं. या मिथ्याचारामुळे व्यक्तिव्यक्तींचा मनमोकळेपणा नाहीसा होऊन, 6 परस्परांचाच परस्परांना जाच होऊं लागतो, व एवढ्या तेवढ्या दोषासाठी चांगलीं गुणी माणस