पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अधिकार तैसा देऊं उपदेश. २०९ होती. एकदां कुटुंबांतील लोकांच्या स्वतःच्या आप्त स्वजनांच्या व कुलपरंपरेच्या गोष्टी सांगावयास लागले, की असे वाटे, की जणूं काय सर्व जगांत कौतुक करण्यासारखे इतर जातिकुल त्यांना दिसतच नव्हते. पहिल्या पहिल्यांदां त्यांच्या या करण्याचे मोठे आश्चर्य वाटे. परंतु जसजसा जास्त परिचय झाला, तसतसे त्यांच्या या वागण्याचें महत्व लक्षांत आलें. एक तर असें कीं, त्यांच्याभोंवर्ती असणाऱ्या निरनिराळ्या अधिकाराच्या आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयाच्या लोकांना कांहींतरी शिक्षण मिळावें, अशा तऱ्हेच त्यांचे वागणे असे; त्यामुळे 'बद्धची चेववावे मुमुक्षु निरूपणे' अशा समर्थांनी म्हटल्याप्रमाणे उत्तरोत्तर क्रमानें त्यांस शिक्षण देण्याची आवश्यकता व पद्धति होती. मनुष्यशरीर प्राप्त झाले म्हणजे प्रत्येक जीव लागलींच देवत्व संपाद- ण्याच्या योग्य होतो असें नाहीं. मानवकोटीपर्यंत उत्क्रांत झालेल्या जीवाचें मन केवळ पशुस्थितीमर्धेच असते; अशा त्या मनाची संपूर्ण वाढ होऊन, म्हणजे त्यांत ज्या अनेक प्रकारच्या शक्ति आहेत; त्यांचा इष्ट तसा विकास होऊन, त्याची पकड कांहीं ढिली झाली, तरच मनुष्यजीव त्याच्या पलीकडील देव- त्वाच्या पायरीवर स्थिर होऊं शकेल. एरवीं निग्रहानें अथवा क्वचित् कोणाच्या अनुग्रहानें त्या पायरीस हात लागला, तरीही अखेरीस मनाचा जोर जास्त होऊन जीव मार्गे खेचला जातो, आणि हातची पायरी निसटून जाते. सारांश काय कीं, येथें सर्वथैव निग्रहाचेंच काम नाही. म्हणूनच ' या संसारीं जन्मूनियां | निवदावें सकळ इंद्रियां। मग पावे धर्मकाया। नाहीं तरी गति नव्हें ॥ ' असे न केल्यास केवळ हट्टानें थोडेंसें साधलेंसें वाटलें तरी, ' निर्मळ मोक्ष ' मिळत नाहीं, आणि जन्मांतरीं म्हणजे पुढे केव्हां तरी, तीं बाधा करतात, असे अनुभवी लोकांचे अनुभव व शास्त्राचे सिद्धांतही आहेत. आणि म्हणून इंद्रिय- प्रवृत्ति म्हणजे अर्थातच मनाच्या निरनिराळ्या वृत्ति यांचा निवळ तिरस्कार न करतां आदर करूंन त्यांचेंच साह्य आपल्या कामास जीवानें मिळवावें, व त्यामुळे त्याची उन्नति अनायास लौकर व्हावी, अशा तऱ्हेच्या प्रणालिका वेदांनी घालून दिल्या. ॥ दुसरे असे कीं, जीवाच्या ठिकाणीं या ज्या निरनिराळ्या शक्ति १४