पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०८ साक्षात्परिचय ' येथल्या लग्न मुंजीसारखे पार पडत असे. व सहज दोनचारशें पान होत असे ! परंतु, याविषयी त्यांच्याशी एकदां बोलत असतां थोडेसें खिन्न झाल्यासारखें करून ते म्हणाले, 'अरे काय सांगतोस ? मला तर मोठी लाज वाटते. भाऊ- साहेबांच्या वेळी पक्ष म्हणजे जवळजवळ नऊशे पान होत असे ! त्या मानानें मला तर वाईट वाटतें. परंतु तशीच महाराजांची इच्छा.' चिरंजीवाचें लग्न त्यांनी लांबविलें, आणि त्या काळाच्या मानानें त्याच्या मर्यादेची सीमा होऊन गेली, म्हणून त्यांचे स्नेही एकदां बाबासाहेब यांची तारीफ करून म्हणाले की ' तुमच्या मुलाची तरी धन्यच आहे. दुसऱ्या श्रीमंताचा मुलगा असता, तर कवींच परभारें लग्न करून घेतलें असतें!' त्यावर मोठ्या झटक्यानें त्यांनी उत्तर दिलें, “ बाळासाहेब, तीं मुलेही तशीच असतात ! " चैत्रांतल्या हळदीकुंकवासारख्या साध्या गोष्टीपासूनही त्यांचा कटाक्ष, सारें पूर्वीसारखें, कांहीं कमी न पडतां झाले पाहिजे, असा असे. एकदां हळदीकुंकवाचे प्रसंगी बाजारांतील दुर्मिळतेमुळे टरकांकडी मिळाली नाही. आणि तिचें कांहीं कोणाला महत्त्वही वाटले नाहीं. टरकांकडी ती काय ? क्षुल्लक वस्तु. तिच्यांवांचून हळदीकुंकु थोडेंच अडून राहतें ? परंतु कांहीं कारणानें अण्णा- साहेब यांचे गौरीकडे सहज लक्ष गेलें, आणि त्यांनी विचारलें, 'अरे यांत कांकडी कशी दिसत नाहीं ? ' त्यावर मंडळींनी 'कांकडथा मिळत नसल्या- मुळे आणल्या नाहीत, ' म्हणून सांगितले. परंतु यांची कांहीं केल्या समजूत पटेना वा ! कांकडी नाहीं; असे कसे ? 'हळदीकुंकवाला कांकडी पाहिजेच ' असे म्हणून त्यांनी कांकडीच्या शोधास माणसे पाठविलीं. आणि जरी त्यांची वृत्ति, त्यामुळे अस्थिर होणें शक्य नव्हतें, तरी देखील 'फाँटनब्लू'च्या पूर्वी तडजोड करण्याकरतां झारकडे पाठविलेला कॉलिंकूर परत येण्यास उशीर लागला म्हणून नेपोलियननें अस्थिर होऊन जशी त्याची वाट पाहिली, व माणसांवर माणसें पाठविलीं, तसेच त्यांनी केले. अखेरीस कोठें एक कांकडी मिळाली तेव्हां त्यांना संतोष झाला, व हळदीकुंकवाचा समारंभ नीट झालासें वाटलें, कोणाही माणसासंबंधानें एरवी त्यांच्या ठिकाणी अतिशय विलीन भाव असे. एखाद्या भणंग भिकाऱ्याच्या पायावर डोके ठेवतांनाही त्यांना कसेंसें कधींच झालें नाहीं; परंतु सणावाराचे पोस्त द्यावयाचे म्हणजे मात्र ते सरदारी थाटानें दुरुनच त्याचे अंगावर झोंकावयाचें! अशी त्यांची तऱ्हा अखेरपर्यंत 6