साक्षात्परिचय ' आतां ज्योत मालवते की काय, असे कठीण प्रसंग येतात. व तेवढा तो काळ निघून गेला, कीं, पुनः प्रकृति सुधारण्याच्या मार्गास लागते. अशा विकट प्रसंगी हा रक्ताचा जोरच त्यांतून पार पडण्यास उपयोगी पडतो. म्हणून असा विशेष काल टळून जाईपर्यंत त्याच्यापुढे जाऊन उभे राहूं नये. " या- प्रमाणे त्यांच्या सर्वच वर्तनामध्यें दिसावयाला एक प्रकारचा नादिष्टपणा, परंतु वस्तुतः असे कांहींतरी धोरण असे. २०० सर्व कामांत जरी याप्रमाणे त्यांचा संथपणा असला तरी एका कामांत मात्र त्यांची तरतरी विशेष दिसून येई. आजपर्यंत जगांत झालेल्या सर्व महा- पुरुषांच्या गुणदोषांची जर सरासरी काढली, तर असे आढळून येईल की, त्यांच्या अंगीं एक गुण बहुत करून सामान्य होता. सर्व साधारण माणसांच्या मानानें हे लोक चालणारे फारच जलद असतात. त्यांच्या रोमरोमांतून सळ- सळणाच्या क्रियशक्तीमुळेच असे होत असावें. श्रीसमर्थांच्याविषयीं तर गिरि- धरांनीं ' सोडलेला तीर पुढे होऊन मागच्या हातीं धरतात' असे त्यांच्या चालण्याचें काव्यमय वर्णन केले आहे. स्वामी रामतीर्थ वगैरे लोकप्रसिद्ध व्यक्तीही अशाच जलद चालणाऱ्या होत्या. लोकमान्यांची चालण्याची तडफ तर सर्वांच्या परिचयाचीच आहे. अण्णासाहेबांचेंही सहज चालणे अतिशय वेगाचें असून हाच त्यांचा वेग अगदी अखेरपर्यंत तसाच टिकला. एकदां चालू लागले म्हणजे चांगल्या चालणान्यालाही त्यांची साथ करणे कठीण जाई, व चांगला सशक्त मनुष्यही त्यांच्यावरोवर फार थोड्या वेळांत थकून जाई. १९१५ साली आषाढला आळंदीस जात असतां नाक्यापाशीं सहज गाडर्डी- तून उतरले, व चालू लागले. श्रीगणपतिअथर्वशीर्षाचा अर्थ जवळच्या माण- सास सांगत होते. बोलतां बोलतां दिधी उलटून जाऊन मोठ्या पादुका केव्हां आल्या, हेंहि लक्षांत आले नाही. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचें यत्कि- चितही चिन्ह नव्हतें. अशाच तऱ्हेनें एकादेवेळी बोलत उभे राहिले म्हणजे वेळेस पांच पांच तास निघून जात, तरी त्यांना कवीं वसावयाची आठवण होत नसे. अशा वेळीं श्रोत्यांची तर त्रेवाच उडून जाई. कोठें भिंतीचा आ- धार घे, कोठें खर्ची टेबल, कांहीं उंच असेल त्याच्यावर रेलल्यासारखें कर अर्से करून अखेरीस मर्यादेची कल्पना सोडून देऊन खुशाल खालीं बसावें, व त्यांनी मात्र समोर उभे राहून चार चार तास मोठ्या आनंदानें बोलावें,
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२४
Appearance