पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दीर्घसूतीपणांतली धोरणें. १९९ याच दृष्टीनें धर्माची घडी बसविण्याची खटपट करणारे लोक कितीही विद्वान् असले, आणि परमेश्वराच्या अस्तित्वाचा बडबड त्यांनी तोंडांनी कितीही केली, तरी ते इरसाल नास्तिक असतात व त्यांचे सर्व प्रयत्न इतर कित्येक शास्त्रांप्रमाणेंच धर्मशास्त्राचेही प्रवर्तन सामाजिक कारणानेंच झाले आहे, अशाच समजुतीवर चाललेले असतात. वरील महा सिद्धांत ज्यांच्या पचनीं पडणे शक्य नसेल, त्यांनी पाहिजे तर वाटेल त्या समजुतीवर चालावें. परंतु जों- पर्यंत हा सिद्धांत खरा असणे शक्यच नाही, असे सिद्ध करता येत नाही, तोपर्यंत धर्मशास्त्राची व त्याच्यावर विश्वास ठेवून अत्यंत प्रामाणिकपणानें, कर्मठतेनें कष्ट करणाऱ्यांची कीव करण्याचे कारण नाहीं. असो, सांगावयाची गोष्ट हीच की धर्मशास्त्राशी जेथें ज्योतिषाची सांगड आहे, तेथेंच फक्त त्यांच्या जवळ ज्योतिषाची प्रतिष्ठा होती. एरवीं लोक ज्या रीतीनें त्या शास्त्राचे महत्व समजतात, तशा रीतीनें त्यांना त्याचे महत्व वाटणें शक्यच नव्हते आणि दुसऱ्याच्या बाबतीतही कधी त्यांनीं तें दाखविलें नाहीं. उलट ' जरी ज्योतिष- शास्त्र कितीही खरे असले तरी त्याचा काय उपयोग ? त्याप्रमाणे होणें न होणें हें तर अखेरीस महाराजांच्यांच स्वाधीन, ' असेंच ते सांगत असत. त्यांच्या दीर्घसूतीपणांत या शिवाय दुसरीही कित्येक तंत्रे असत. एकदां एक रोगी अत्यवस्थ होता. आणि अण्णासाहेबांना पाहण्याविषयीं त्याचा अट्टा- हास चालला होता. त्याला पाहून येणे म्हणजे सरासरी पंधरा मिनिटांचेंच काम होते. परंतु कितीही तगादे आले तरी, दोन तीन दिवसपर्यंत यांनी सवडच केली नाहीं. ‘आत्तां येतो,' 'मग येतों,' 'विष्णूला जाऊन तसाच येतों,' असें म्हणून तीन दिवस तसेच लोटूं दिले. त्याच्या येथील मंडळी तर फारच खट्टू होऊन गेली. अखेरीस कुठें यांना जावयास फावले. त्यावर ' हें काय तुमचें करणे ? ' म्हणून प्रश्न विचारला असतां त्यांनी सांगितले की, “ पंधरा मिनिटांची सवड करणें कांहीं कठीण नव्हतें, परंतु पूर्वी जाणे रोग्या- च्या दृष्टीनें हितावह नव्हतें. रोगी अत्यवस्थ असतां त्याला जर एकादा ध्यास असला तर, अथवा अमुक मनुष्य येईल, व त्यानें मी बरा होईन' अशी कांहीं आशा असली तर, त्याचा त्याच्या रक्ताला जोर असतो अशा वेळेला, जर त्याच्या मनाप्रमाणे घडून आलें, तर रक्तांतील जोर नाहींसा होऊन, एकदम दगा होण्याचा संभव असतो. अशा अवस्थांतून असे घडतें कीं, मधूनमधून