Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अगदी क्षुल्लक कृतीतही मोठें धोरण. २०१ असेंच नेहमीं घडून येई. होमरूल लीगच्या वेळेला श्री० दादासाहेब खापर्डे नागपूरचे बॅ. अभ्यंकर, डॉ० परांजपे वगैरे मंडळीही आळंदीस आली होती. त्यांनी प्रसाद घेतल्यावर जावयाची तयारी केली. 'आत्तां इतक्यांत कशाला जातोस, संध्याकाळी आरती करून कां जात नाहीं ! ' असें अण्णासाहेब म्हणत होते, व 'छे, मला गेलेच पाहिजे,' असा दादासाहेबांचा आग्रह होता. अशा रीतीनें बोलत बोलत सारी मंडळी रस्त्यावर आली, व मोटार सुटण्याची • तयारी होत होती म्हणून सहज तेथे उभी राहिली. इतक्यांत कर्मधर्मसंयो- गानें त्या मोटारीचें कांहीतरी तंत्र चिघडले. मंडळींना वाटलें इतक्यांत मोटार दुरुस्त होईल, मठांत जाऊन काय करावयाचें ? परंतु बराच वेळ होऊन गेला तरी मोटारीचें तंत्र जुळेना. इकडे अण्णासाहेब जे बोलत उभे राहिले, ते रात्री ९ वाजेपर्यंत आरती होऊन मंडळी जाईपर्यंत तसेच उभे होते | श्री दादा- साहेब वगैरे मंडळींनों भिडेभिडेनें पराकाष्ठा तासदीड तास कशीबशी कळ • काढली. अखेरीस नाइलाज होऊन समोरच्या जोत्यावर सर्वांनी तळ दिला व अण्णासाहेब मात्र मंडळींनी बसावयाचा कितीही आग्रह केला तरी 'आतां बसतों, थोड्या वेळानें बसतों,' असे करीत पुरे सात तास तसेच्या. तसेच उभे होते. त्यांच्याशी बोलतांना नेहमी असे प्रसंग येत. पुष्कळ वेळां असे होई कीं, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना दिले म्हणजे ऐकणान्याला 'आतां झालें' असे वाटून तो निघून जाण्यास पाही, अशा वेळी यानीं उगीच कांहीतरी बोलणें काढावें, व त्याला दोन दोन तास अटकवून ठेवावें. खुद्द त्या ऐकणाराला असे होऊन जाई कीं आतां हे पुरे कांकरीत नाहीत ? परंतु अशा रीतीनें कांहीतरी फालतू गोष्टींत 'स्वतःचा वेळ खर्चण्यांत त्यांचाही कांहीं हेतु असेल, असे कोणाच्या लक्षांत येऊं नये. आणि अगदी क्वचित् प्रसंग टाकले तर, त्यांनीही कधीं को- णाच्या लक्षांत येऊं देऊं नये. परंतु त्याच्या मुळाशी अगदी सूक्ष्म कां होईना, दुसऱ्याचें कांहीं तरी हित करण्याची बुद्धि असे. परंतु, त्यावरोवरच त्यांच्या आंगच्या अलौकिक लीनतेमुळे तसें त्याला उघड तरी कसें बोलून दाखवावें, असा त्यांच्या वृत्तींत संकोच होई. तेवढ्याकरितां स्वत;च्या कामाचा • वेळ मोडून, व तें काम मागून करावें लागल्यामुळे झोंप, खाणेपिणें, वगैरे बाबतींत हाल सोसून आणि वर पुन्हां पदरांत भ्रांतिष्टपणा घेऊनही तसें पर्या-