पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ 'साक्षात्परिचय' होऊं शकेल ? ' असे ते नेहमीं म्हणत असत, ते अशाच अर्थानें धर्मशास्त्रां- मध्यें आपद्धर्माचा एक भाग ठेवला असून एकंदर धर्मशास्त्राची आणि मनुष्यव्यवहाराची सांगड घालतांना सारें तडजोडीचेंच धोरण ठेवलें आहे, त्यावरून असा ग्रह होतो कीं, मनुष्यानें आपल्या समजुतीनें व सोयीनें तडजोड करून आचरावयाचाच हा भाग आहे. परंतु अशी तडजोड आणि सोय तेथें ( असणे वास्तविक नाहीं. सांगितली आहे, ती नाइलाज म्हणून सांगितली आहे. म्हणजे एवीतेवीं मनुष्याची ताकद चालतच नाही, तर निदान परंपरा मोडून अजिबात तत्त्वलोप होऊं नये, अथवा ' अकरणान्मंदकरणं श्रेयः ' याच न्यायानें सांगितली आहे. परंतु त्या त्या मानानें परिणामांतही समव्यस्तता आलीच पाहिजे, असेंच त्यांच्या सांगण्याचें धोरण आहे. अथवा तशाच इतर कांहीं खोल कारणांनी सांगितली आहे. केवळ आपद्धमे म्हणूच मांसभक्षणास प्रवृत्त झालेला विश्वा- मित्रही आपणास आपद्धर्मांत केले म्हणून त्याचा अनिष्ट परिणाम भोगावा लागणार नाही, असे म्हणत नाहीं; तर यानें जो दोष लागेल त्याचें परिमार्जन शरीर राहिलें असतां तपानें करून इतरही पुण्य संपादीन, तेव्हां शरीर टाक- ण्यापेक्षां मांस खाऊनही जगविणें जास्त फायदेशीर आहे, असे म्हणतो. धर्म, विष्णु, बह्मदेव इत्यादिकांनाही आपत्तीत केलेल्या दोषाचारांचें प्रायश्चित्त सोसावें लागले, असे ग्रंथांत जागजागी वर्णन आहे. सारांश इतकाच की सत्य म्हटलें म्हणजे तेथें तडजोड नाही. जेथें कोठें अशी तडजोड आहे, अथवा आणावी लागते, तेथें ती अर्थातच फलप्राप्तीचा कांही तरी प्रमाणांत उणेपणा स्वीका- रूनच करावी लागते. आणि म्हणूनच आपद्धर्म हा तात्पुरता आहे, हे लक्षांत ठेवून आपत्ति निवारण्याचा प्रयत्न करण्याची व निवारण होतांच पुन्हा मूल- पदावर येण्याची माणसावर जबाबदारी आहे. हें तत्व विसरून जाऊन कंचु- कीच्या हातांतील आचारयष्टीप्रमाणे आपद्धर्मच ज्या वेळेला प्रस्थानसाधनच होऊन बसतो, तेव्हां अर्थातच संस्कृतीचा -हास होऊन कांहीं तरी निरनिराळ्या चिजा उत्पन्न होतात. आणि म्हणूनच त्यांनी कोणचेंच निश्चित साध्य पदरांत न पडतां ' यस्य कस्य तरोर्मूलं येनकेनापि मिश्रितम्' या न्यायानें कांहीं तरी घडून येतें. सारांश काय, कोणचाही धर्म म्हटला म्हणजे त्याचें आचरण, सुख आणि सोय यांची प्रतिष्ठा ठेवून नेहमींच करतां यावयाचें नाहीं आणि केवळ