Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्य म्हटले की तडजोड नाहीं. धात्मक कशीही असो-तेथें मात्र ज्योतिषशास्त्राला त्यांच्या वागणुकींत महत्त्व येई, आणि ज्या मळसूल (Fulerum) वर त्यांच्या वागणुकीचे एकंदर नियम बस- लेले होते, त्याच्या दृष्टीने पाहतां, कोणाही विचारवान् प्राण्यास त्याबद्दल उप- हास किंवा कीव करण्याचा एकदम धीर होणार नाही. मनुष्य आणि त्याची क्रिया अशी एक तुटक वस्तूच या भरल्या विश्वांत त्यांच्यापाशी नव्हती. विश्व आणि त्याचा एक घटक परमाणु मानव प्राणी यांचा युतावयव संबंध त्यांच्या दृष्टीला सूर्यप्रकाशा. सारखा धडघडीत दिसत होता. अर्थातच मानवी क्रिया सभोवतालच्या दृश्यव्यव- हाराच्या निमित्तानेंच उत्पन्न होते, आणि कांहीतरी दृश्य परिणामांतच तिचे पर्यवसान आहे अशी त्यांना कल्पनाही करवत नसे. त्यामुळे त्यांचा गोतावळा सर्व विश्वरूपच होता. म्हणून मानवी क्रियेचे परिणाम कमीजास्त प्रमाणानें, व थोड्या बहुत कालावधीनें इतर विश्वघटकांसही सोसावेच लागतात, व त्याचप्रमाणे, शाकुं- तलांतील विदूषकानें म्हटल्याप्रमाणें – यद्वैतसः कुब्जलीलां विडंवयति तत् किं आत्मनः वेगेन ? ननु नदीवेगेन' याप्रमाणेच मानवी क्रियेसंबंधही त्यांची धारणा होती. आज जरी अनेक खच्या खोट्या कारणांनी धर्मशास्त्र म्हणजे एक सांवळा गोंधळ झालेला आहे, तरी वैदिक धर्मातील एकूणएक आचारपरंपरा आणि विचारसरणी यांची मांडणी याच महातत्त्वाला धरून केली असल्यामुळे पुष्कळ वेळां असे होण्याचा संभव आहे कीं, विधि म्हणून सांगितलेल्या कित्येक गोष्टींचा इष्ट परिणाम झालेला मुळींच दिसत नाही. अथवा बहुतकरून इष्ट परिणामांत तरी झालेला दिसत नाही. हीच गोष्ट सर्व प्रकारच्या निषेधांविषयींही आहे. म्हणजे नित्य मृत्युयोगावर आणि घातवारावरच इमथु करणारा भरपूर शंभर वर्षे निरामय राहिलेला दिसून येतो, व त्यामुळे धर्मशास्त्राविषयों उपहास उत्पन्न होतो. परंतु विश्वपरमाणु आणि विश्व यांचा हा आघातप्रत्याघातसंबंध लक्षांत ठेवला तर धर्मशास्त्रांतली ज्योतिषशा- स्त्राची भानगड केवळ खुळसटपणाची अथवा मतलवाची होती, असे म्हणतां येत नाहीं, व हा सिद्धांत ज्याला पटला आहे, त्याला तिला अनुसरून वाग- णेच भाग आहे. आतां एवढे मात्र खरें, की असे वागणाराला व्यवहारामध्ये कमाली अडचणी उपस्थित होतील, व त्याला केवळ प्रो. विक्षप्तमूर्ति म्हणू- नच रहावें लागेल. पण त्याला इलाज काय ? सत्यापुढें तडजोड नाहीं, सत्य तें सत्य; एक तर सगळें धरा, नाहींतर सगळे टाका; पण तेथें तडजोड कशी