Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० साक्षात्परिचय ' "मराठीत वावरत असतां भाषाशुद्धीकडे त्यांचे अगदीं सावरकरीच नसले तरी कमालीचें लक्ष असे. प्रचारांत अगदींच रूढ होऊन वसलेले व पारिभाषिक शब्द सोडले तर, त्यांच्या बोलण्यांत सहसा परकी शब्द नसावयाचा. लिहिण्यांत देखील केवळ पारिभाषिक शब्द सोडले तर, एक देखील परकी शब्द आढळेल कीं नाहीं कोण जाणे. अशा रीतीनें भाषाशुद्धि सांभाळण्यास जवळील लोकां- सही ते सांगत. प्रचारांतला अगदी साधा ' कायम ' असा शब्द काढून तेथें ‘ स्थिर' शब्दाची योजना करण्यास तर त्यांनी दहा पंधरा वेळां शिकविल्याचे आठवतें. 6 यांच्या लिहिण्याचें व शब्दयोजनेचे एक उदाहरण पाहण्यांत आलें. १९१५ सालच्या पुण्यास भरलेल्या प्रांतिक सभेचे ते स्वागताध्यक्ष होते. या सभेची - सर्व व्यवस्था लोकमान्यांच्या कडेच होती, व त्यामुळेच या प्रसंगाला अनुसरून अशी एक आठवण रा. सदाशीवराव बापट यांनी आपल्या लोकमान्यांच्या आठवणीत घातली आहे. येथें हेहि सांगणें अवश्य वाटतें की रा. वापट यांनी ही आठवण थोडीशी नीट आठवण न करतां दिली आहे. एकदां एकाद्या माणसास मान द्यावयाचा म्हटला म्हणजे त्याच्यामुळे किर्ताही गैरसोय झाली तरी ती लोकमान्य किती आनंदानें करून घेत, हें सांगण्याचा, ही गोष्ट देण्यांत हेतु आहे. लोकमान्यांच्या गुणांविषयीं आमचें कांहींच म्हणणें नाहीं. पुण्यांतील कोणाही शिष्टापेक्षां अण्णासाहेबाविषयीं अधिक पूज्यभाव व त्यांच्या योग्यतेची जाणीव लोकमान्यांच्या मनांत होती, आणि अण्णासाहेबांचाही त्यांच्यावर तसाच लोभ असून त्यांचें ऊर्जित व्हावे म्हणून ते परमेश्वराजवळ नित्य प्रार्थना करीत, याविषयीं • पुण्यांतील लोकांस तर शंका नाही. परंतु ही आठवण पुरती न दिल्यामुळे अण्णासाहेब यांच्याविषयों आपण मोठा विपरीत समज उत्पन्न करीत आहों, हें वापटांच्या लक्षांत आले नाही. अण्णासाहेब यांस खाजगी व्याप कितीही असला, व त्यामुळे त्यांची कामे उरकण्यांत धांदल, अनियमित श्रम वगैरे कितीही असले, व अगदीं गळ्याशी येऊन भिडेपर्यंत कामास हात न घालण्याचा त्यांचा केवढाही हट्ट असला, तरी देखील एकादें सार्वजनिक काम त्यांनी अंगा- वर घेतलें, आणि ते ठराविक वेळेत कधीं केलें नाहीं, असें घडल्याचें एक तरी उदाहरण कोणी दाखवून द्यावें. त्यांच्या सर्व बाबतींप्रमाणे असल्या कामांतही