Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक गैरसमज. १९१ त्यांचे कांहीं धोरण असे, व पन्नास तगादेदारांनी कितीही सतावून सोडलें तरी खरोखर त्यांनी कधीं घाई केली नाही, अथवा कोणी पुन्हा आठवणही दिली नाहीं, तरी स्वतः आठवण ठेवून तें करण्यास कमी केले नाही. परंतु त्यांच्या या वरकरणी धांदरट आणि दीर्घसूत्री परंतु वस्तुत स्थिरगंभीर अशा स्वभावाची कल्पना नसल्यामुळे, क्रियाशक्तीच्या घमेंडींत असलेल्या आम्हांस स्वतःच्या अधीरपणामुळे त्यांची खात्री वाटत नसे, व उगीच अण्णासाहेबास सतावून सोडावें, आणि वर पुन्हां " मी होतो म्हणून तर येवढे झालें, नाहीतर अण्णासाहेब म्हणजे काय, 'वाघाची जांभई ! " अशी फुशारकी मारावी, असेंच नेहमी होई. रा. केळकरांना लोकमान्यांना कांहीही म्हटले असले तरी, एक गोष्ट खरी आहे कीं, तें भाषण अण्णासाहेबांनीच लिहिले, व तें आपल्या धोरणाप्रमाणे ठराविक वेळेच्या थोडेसे आधी लिहून दिलें. रा. बापट यांच्या कामगिरीने त्यावर कांहीही परिणाम झाला नाही. परंतु त्या भाषणावरील नर-

  • सोपंतांचा शेरा व टिळकांचे अण्णासाहेब विषयींचे उद्गार एवढेच नुसते देऊन तें

भाषण अण्णासाहेवांनीच तयार केले होतें, हें न सांगितल्यामुळे असा समज होतो की परमार्थाच्या मागे लागून अंगावर घेतलेली सार्वजनिक कामेही अण्णा- साहेब बिघडून टाकीत, व केवळ त्यांच्याविषयांच्या आदरामुळे लोकमान्य तें कसेंबसें निस्तरीत. रा. बापट यांचा आणि अण्णासाहेब यांचा निकट संबंध पुष्कळच आला असल्यामुळे जेथें अण्णासाहेबचा संबंध आहे. तेथें तरी त्यांनी ज्यास्त काळजी घ्यावयास पाहिजे होती. असो. मूळ सांगावयाची गोष्ट अशी कीं, अण्णासाहेबांनी तयार केलेले भाषण साधारणतः ३०/४० मिनिटें पुरावें इतक्या बेताचें होतें; परंतु दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांत त्या भाषणाला इतका देखील वेळ देण्याची सवड नव्हती. जेमतेम २० मिनिटेंपर्यंत तें चालावें असें ठरलें. इतर कोणाचें भाषण असतें, तर तें तेव्हांच कमी करून टाकण्यांत आलें असतें, परंतु यांच्या बाबतीत तसे करतां येईना. म्हणून लोकमान्य स्वतः अण्णासाहेबाकडे येऊन विनंति करूं लागले, कीं भाषण तर आपलेच आहे, परंतु आह्मांस जेमतेम २० मिनिटापेक्षां वेळ नाहीं, तेव्हां याची कांहीं तरी तोड काढून द्या. " तूंच सांग यांत मी काय कमी करूं तें' म्हणून भाषण त्यांच्यापुढे ठेवलें. अधिक त्यावर अण्णासाहेबांनी