पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचे भाषण व लेखन. त्यांच्या प्रसादांतून सुटलेला एक तरी वक्ता आढळेल की नाहीं, कोण जाणे !. परंतु अण्णासाहेबांचे भाषण - आणि हें भाषण बहुधा अध्यक्ष या नात्याने केलेले असावयाचें-तीन तीन तासपर्यंत निमूटपणानें ऐकून घेत. मारुतीच्या शेपटाप्रमाणें तें एकदां वाहूं लागले की धीर निघून जावयाची वेळ येई. तरी एका शब्दानेंही त्यांनी कधी अवहेलना केली नाहीं, अथवा आसनास कितीही मुंगळे लागले तरी आसन सोडून गेले नाहीत. जागच्याजागींच एकमेकांत. कुजबुजावें, व लहान मुलांनी घरच्या म्हाताऱ्याची थट्टा करावी त्याप्रमाणें ‘ काय करावें वुवा, अण्णासाहेब आहेत,' असे म्हणून थट्टेच्या शब्दांनीं आपसांत त्यांच्या अनेक गोष्टींचे कौतुकच करावें. असेच नेहमीं घडून येई. लिहिण्यांत देखील त्यांची तन्हा अशीच होती – म्हणजे व्याख्या- नासारखें तें विस्कळित असे, असें नाहीं; उलट त्यांच्याइतका मुद्देसूद लिहि- णारा क्वचित्. तरी पण आपले म्हणणें वाटेल त्याला अगदीं निःसंदेहपणें समजावें, समर्थांनी म्हटल्याप्रमाणे ' गरज केली लेखकापासुनी' असे घडूं नये, म्हणून विस्तृत व पाल्हाळिक झाले तरी हरकत नाहीं, पण अगदी स्पष्ट मांडले गेले पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता. चटकन् दोन शब्दांमध्ये मोठा भाव आणावयाचा, असे त्यांनी कधी केले नाही. एकादें काम करावयाचें म्हटलें म्हणजे तें यथासांग करण्यास जशी तिथें कोणच्याही त-हेच्या खर्चाची मनाई नव्हती, तसाच प्रकार लिहिण्यांतही होता. त्यांचा खजिना इतका विपुल होता कीं, हवे त्या प्रसंगास लागणाऱ्या अनेक प्रकारच्या शब्दांच्या नाण्याची त्यांना कधींच तूट पडली नाही. त्यामुळे शद्बसौष्टव हा गुण त्यांच्या भाषे- इतका क्वचितच आढळून येतो. मनांतील भाव व्यक्त करतांना अगदी हवा तोच शब्द वापरल्यामुळे, आणि अगदी साध्या लिहिण्यापासूनही न्याय, कायदा स्थलकालमान, आणि तारतम्य यांचा खोल विचार असल्यामुळे, यांची अली- कडील भाषा चटकदार, अथवा आल्हादकारक असणें शक्यच नव्हतें; उलट त्यांच्या स्वभावाप्रमाणेच ती थोडीशी कठोर, परंतु खंजिराप्रमाणें लखलखणारी व समजुतीचे पडदे फोडून आंत घुसणारी होती. 'आपण योजिलेला शब्द काढून, बरोबर तोच भाव व्यक्त करणारा दुसरा कोणचाही शब्द कोणी योजून दाखवावा, ' असे ते मोठ्या अभिमानानें म्हणत. इंग्रजी लिहिण्याचा व बोलण्याचा त्यांना मनापासून कंटाळा होता, व