पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ 'साक्षात्परिचय ' , ढेच म्हणतां येईल की, श्रीसमर्थांच्या 'वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या 'नाना कळा ॥' अथवा ' मुलांच्या चालीनें चालावें । मुलांच्या चालीनें शिक वावें ॥ " वगैरे, म्हणजे एक तऱ्हेनें या सूत्राचे विवरणच होय. विषयाचें खरें ज्ञान व सात्म्य होण्यास शिकणाऱ्याच्या अंतःकरणांत त्याची खरी हांव उत्पन्न होणें अवश्य आहे. त्या विषयींचा प्रश्न आपण होऊन विद्यार्थ्याने करणे हैं, स्त्रियांच्या रजोदर्शनाप्रमाणे, विषयरूप गर्भ धारण करण्यास बुद्धीची तयारी झाली असल्याचे द्योतक आहे. अशी तिची तयारी असल्याखेरीज केलेला ज्ञान- दानाचा प्रयत्न, रजोहीन समागमाप्रमाणे सुखकारक वाटला तरी व्यर्थ आहे; आणि म्हणूनच नापृष्टः कस्यचित् ब्रूयात् " असा श्रुतिनिर्बंध झाला. याचा अर्थ असा नाहीं को कोणी विचारीतच नाही, या सबवीवर ज्ञानदानाच्या जयाबदारींतून ज्ञात्याने मोकळे व्हावें. तर उलट आपले कर्तव्य अधिक कौश- ल्यानें करण्याची त्याचेवर जबाबदारी येते. अशा सुवीनें लोकांशीं वागाव- याचें कीं, जे त्यांस सांगावयाचें आहे, त्याविषयी आपण कांहींही बोलतां त्यालाच प्रश्न करण्याची बुद्धि व्हावी. म्हणजे अर्थात् त्याची तयारी व्हावी; व मग त्याच्याकडून प्रश्न आला म्हणजे त्याला शिकवावयाचें हें खया शिक्ष- णाचें इंगित आहे. अशा पद्धतीने शिक्षणकार्य घडून येण्यास बीजक्षेत्रन्यायानें गुरु व विद्यार्थी यांची स्वभावतःच क्षमता लागते. तसा योग न घडून आल्यास उत्तम बीज असूनही वांया गेल्यास शेतकऱ्याकडे काय दोष आहे ? अण्णासाहेबांसारख्यांजवळ शिकण्यास अवश्य असलेली पूर्व तयारी झालेली असून, निवळ ज्ञानार्जनाच्या लालसेनेंच त्यांच्याजवळ आलेले, असे साक्षेपी गृहस्थ कितीसे होते ? हेंहि एक वर सांगितल्याप्रमाणे ' देशाचें दुर्दैव ' च आहे. त्यांना तर सांगण्याची इतकी होस होती की, त्यामुळेच व्याख्याते या नात्यानें त्यांची मोठी चमत्कारिक स्थिति होत असे. पूर्वीचें काय असेल तें असो, पण अलीकडच्या काळांत तर अण्णासाहे- बांचे व्याख्यान म्हणजे पुण्यातल्या लोकांना ' सदर्न मराठी'चा प्रवासच वाटे. सहज १५/२० मिनिटांकरितां बोलावयास उभे राहिले तर, तास दीडतास निघून जाई. वेळेचें भान, विषयाची संगतवार जुळणी व नीटसपणा, यांचा तर पत्ताच नसायचा | पुण्यांतील लोकांवर असलेल्या त्यांच्या वजनाची खरोखरच कमाल आहे. पुण्याचा श्रोतृसमाज म्हणजे नंबर एकचा टारगट. 1 66 "