पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्राचीन शिक्षणपद्धतीचें रहस्य. १८७ रागाऊं नये; उलट, प्रसंग आला की आपला सांगण्याचाच प्रयत्न करावा. त्या मुळे शास्त्रीय ज्ञान दुसन्यास देण्याची इच्छा असूनही तसे घडणें शक्य नव्हतें, कारण त्यांना तेवढाच उद्योग नव्हता.

अण्णासाहेबांनी ग्रंथलेखन वगैरे कां केले नाही, म्हणून विचारणाऱ्या लोकां- नींही त्यांच्या अनंत व्यापाचा, व ज्यांत झोपेसारख्या अपरिहार्य विश्रांती- सही वेळ मिळत नसे, असल्या परिश्रमांचा विचार केला असतां, त्यांचें त्यां नाच कळून येईल. " संस्था वगैरे स्थापण्यासारखे काम तुकारामासारख्या उच्च अवस्थेतील विभूतीचे नसतें, ते त्याच्या भोवतालच्या दुसऱ्या माणसांनी करावयाचें असतें, " असे एके ठिकाणी लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे. तीच गोष्ट अण्णासाहेब यांसही लागू आहे. आणि वस्तुतः त्यांनी भाषणद्वारें वगैरे इतकें शिकविले आहे की, त्यांच्या भोवती जर कोणी साक्षेपी माणूस असता, तर दोन तीनच तर काय पण अनेक विषयांवर अनेक ग्रंथ लिहितां आले असते. असा मनुष्य त्यांचेजवळ नव्हता, त्याला त्यांनी काय करावें ? इतर सर्व गोष्टींप्रमाणें हेंहि एक ' देशाचें दुर्दैव' आहे. मनुष्याचा सार्वजनिक व्याप वाढला म्हणजे लिहिण्यासारखी कामे करणे त्यास अशक्य होतें, ही गोष्ट गीतारहस्यासारख्या अमोल ग्रंथ लिहिला जावा, म्हणूनच मंडालेस लोक- मान्यांना विश्रांति देण्याची देवानें योजना केली की काय, असे म्हणणा लोकांस तरी सांगणे नको. 6 हीच गोष्ट इतर विषयांतील त्यांच्या ज्ञानासही लागू आहे. होतां होईल तो शास्त्राज्ञा जशीच्या तशी पाळण्याचा त्यांचा नेहमीच कटाक्ष होता, व नाष्पृष्टः कस्यचित् ब्रूयात् नचान्यायेन पृच्छतः । जानन्नपि हि मेधावी जड- वल्लोकमाचरेत् ' या श्रुतिवचनास धरून त्यांचे सर्व व्यवहार होत असत. आणि तें ठीकच होतें. हा श्लोक दिसावयास जरी कसासाच दिसतो, व त्या- मधें लोककल्याणाविषयींच्या कळकळीचा अभाव दिसतो, तरी वस्तुतः तो फार महत्त्वाचा असून लोकसंग्रह करणाऱ्यांना अवश्य अशा पुष्कळ गोष्टींचा त्यांत संग्रह आहे. वैदिक संस्कृतीतील आर्यशिक्षापद्धतीचीं रहस्यें यांत भरलेली आहेत. ती कशीं, तें फोड करून दाखवावयाचें हें स्थळ नव्हे, तरी पण एव-

  • गेली आठ वर्षे भाग ३.