Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचें विचित्र काळमान. १८१ शेवटीं मुख्यत्वें भुइमुगावरच आला होता. स्थित्यंतर होत असतां प्रत्येक वेळी त्या त्या मानानें कांहीं तरी मुख्य आहार असून बाकीचे उप-आहार ठरत. सर्व आदिकचक्र संपूर्ण झाल्याखेरीज मुख्य आहार तर करावयाचाच नाहीं, हे नक्कीं ठरलेले असे. परंतु परिश्रम, प्रकृतिमान, ऋतुमान वगैरेंच्यामुळे जर कधीं शरीरांत किंचित् आवश्यकता वाटली, तर तेवढ्यापुरता थोडासा उप-आहा- राचा आश्रय करून ते काम चालू ठेवीत. परंतु त्यांतदेखील आह्निकांतील निदान अमुक अमुक गोष्टी तरी साध्य झाल्या पाहिजेत, असें ठरलेले असे. लोकांना वाटते त्याप्रमाणे खरोखर पाहिले तर भोजनास आवश्यक असे त्यांचें आह्निक कांहीं मोठे नव्हतें; परंतु जनीजनार्दनाच्या सेवेस वाहिलेल्या शरीरावर त्या जनार्दनाचा पूर्ण हक्क आहे, असें तें मानीत, व त्या हक्काच्या उपभोगास कधीही अडथळा करीत नसत. त्यामुळे अगदींच नाइलाजाची गोष्ट सोडली तर, ‘ कसे काय आहे ?' इतक्या कोणीही विचारलेल्या सामान्य प्रश्नास उत्तर देण्यापासून तो अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासांची बैठक करून काम करण्यापर्यंत त्यांनी कधीं कोणास ' नाहीं ' म्हटलें नाहीं; इतकेंच नाहीं, तर केवळ कुटुंबीय अशा तऱ्हेचीं कांहीं माणसे सोडली तर, ' आपले आह्निक व्हावयाचें आहे, थोडेसें थांबा, ' असें नुसतें सांगणेंही त्यांना आवडले नाही. त्यामुळे झालेले आह्निक तितकेंच ठेवून केवळ फालतू- पणाने बोलावयास आलेल्या एकाद्या फालतू माणसाशीही ते सरलपणानें तास तास बोलत बसत, व नंतर त्यांना पुन्हां पहिल्यापासून सुरुवात करावी "लागे. अशा रीतीनेंच खंड पडूनच त्यांचा एक दिवस भरण्यास आमचे कित्येक दिवस लागत ! ब्रह्मा-विष्णु-महेश इत्यादि देवतांचे दिवस त्या त्या प्रमाणांत वाढते आहेत, या पौराणिक कल्पनेचें जणूं काय हें एक स्पष्टीकरणच होतें | आपले शरीर निरोगी स्थितींत राहून कार्यक्षम असार्वे, म्हणून आवश्यक ती गोष्ट ते स्वतःच करीत, अथवा दुसऱ्याकडूनही करवून घेत. मोठेपणाच्या व कर्तृत्वाच्या फुकट ऐटीच्या बळीं तें कधींच पडले नाहीत. असे विशेष प्रसंग त्यांच्या आयुष्यांत फारच कमी येत, परंतु त्या प्रसंगी आपणास काय पाहिजे व कसें पाहिजे, हें नीट सांगून जवळच्या माणसाकडून शांतपणानें ते करून घेत.