Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 १८० साक्षात्परिचय ' > राजांनी आपल्या एका पत्रांत ' परमार्थ हा कष्टसाध्य नसून युक्तिसाध्य आहे ” असे म्हटले आहे. पाणी पिण्यासारख्या क्षुल्लक गोष्टांपासून तो शरीरत्याग कर ण्यासारख्या अत्यंत मोठ्या गोष्टीपर्यंतही त्यांच्या वागण्यांत अशी 'युक्ति असे. अंगी इतका मोठेपणा असतांही व त्यांचा निग्रह दुर्दम्य असतांही एकाद्या प्राकृत माणसाप्रमाणे कोणचीही गोष्ट मोठ्या बेतानें व हळू हळू शरीरास मानवून ते करीत; आणि असे करतांना त्यांस कधींही कमीपणा वा- टला नाहीं. एखादी गोष्ट करावयाचें अथवा टाकावयाचे त्यांच्या मनांत आलें तर, त्यापूर्वी वर्ष वर्ष देखील तसा उपक्रम ते करीत, व लक्षांत न येण्या- जोगत्या साहाजिक रीतीनेंच ती घडवून आणीत. त्यांच्या एवढ्या प्रचंड व्यापांतून स्नानसंध्या इत्याहि त्यांची आहिकें त्यांच्या बरोबर अखंड टिकलीं, याचेंही कारण हेच आहे. त्या सर्वाची आपल्या खान-पान इत्यादि शरीर धर्माशीं व स्थलकालाशीं अशी कांहीं अनुपूर्वी त्यांनी गांठून दिली होती की, त्यामुळे ती विनहरकत होत असत. असे करतांना अर्थातच त्यांना एक गोष्ट सोडून देणें जरूर होतें, आणि ती गोष्ट म्हणजे आमचे रात्रंदिन घटित कालमान ही होय, सामान्य माणसाला जगांत त्याच्याशी संबंध ठेवून वागावयाचें असतें आणि म्हणून त्याच्या कालमानाला सूर्याच्या उदयास्ताचें बाह्य परिमाण असणें ठीकच आहे. परंतु पूर्वी सांगितल्याप्रमाणे सर्व जगाला हे परिमाण देऊन स्वतः एकाकितेनें त्याच्या पलीकडे गगनविहार करणाऱ्या सूर्याप्रमाणेच यांची स्थिति असल्यामुळे यांचें कालमानही 'पर' तंत्र नसून 'स्व'तंत्र असणें जरूर होतें, व हैं दिनमान त्यांनी आपल्या नित्यकर्मावर वसविले होते. महाराजांची चाकरी करून आनंदानें भाकरी खावी, तिच्यांत कुचराई झाली, तर रोजमुन्यास उजा- गरी नाहीं, अशी त्याची शिस्त होती. त्यामुळे नित्यकर्माचे एक मंडल संपून पोटांत पडलें, म्हणजे त्यांचा दिवस होत असे. व हे प्रमाण अखंड चालावें म्हणून आह्निक चक्र पुरें झाल्याखेरीज वैश्वानराला मुळी आहुतीच द्यावयाची नाहीं, असा नियम त्यांनी बांधून टाकला होता. परंतु हीहि गोष्ट ते युक्तीनेंच करीत. आणि एवढ्याकरितां खाण्याच्या पदार्थांपासून त्यांचे संकेत ठरलेले असत. चारी ठाव जेवण, कालवण, दशमी, शेंगदाण्याचा लाडू, वऱ्याचे तांदूळ, बटाट्यासारखी कांहीं भाजी, अशा क्रमानें त्यांचा आहार उतरत उतरत,