पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' साक्षात्परिचय ' त्याचप्रमाणे कोणच्याही गोष्टींत त्यांना वंचकता अथवा कातरता कधीं आलीच नाहीं. श्रीमन्महाराजांचें स्मरण करण्यासारख्या गोष्टीपासून तों एकाद्या भिक्षेकऱ्यास कांही घालण्यासारख्या गोष्टीपर्यंत सर्व कामें सारख्याच आस्थेनें व प्रामाणिकपणानें करावयाची त्यांची रीत होती. त्यांच्या अनशना- बद्दल येवढी प्रसिद्धी होती व सामान्य माणसाप्रमाणे कोणच्याही खाद्यपेयांत त्यांचें खरें चित्त नाहीं, केवळ दुसऱ्याच्या संतोषाकरितांच ते ठाव मांडून जेवावयास बसत; असे जरी होतें तरी, एकदां बसल्यावर उगीच कांहीं तरी थोडेसें खावयाचें व उठून जावयाचें, असें करणे देखील त्यांना आवडलें नाहीं. इतकेंच नव्हे तर, महाराजांच्या इतर सेवेप्रमाणेच हा वैश्वानर यज्ञही ते मोठ्या आवडीनें व मनापासून करीत. एकदां पानावर बसले, म्हणजे स्वसंतो- षानुरूप लागेल तेवढे खावें, लागल्यास निःसंकोचतेने मागून घ्यावें, असा त्यांचा स्वभाव होता. ही गोष्ट सामान्य वाटली तरी अत्यंत निरभिमानता व सरलता यांच्या खेराज साधणे किती कठीण आहे, याची साक्ष मोठे म्हणवि- णाच्या लोकांच्याच अंतःकरणास पटेल. १८२ यांच्या भाषणाचीही अशीच तन्हा होती. एकाद्या विशेष प्रकारच्या धार- णेंत गढून गेलेल्या माणसाप्रमाणे यांचाही आवाज अतीशय लहान होता; परंतु उच्चार स्पष्ट व भाषण संथ असे, आणि त्यांच्या सर्व महात्म्याला साजेल अशीच त्यांची वाणी कोमल व निरुपद्रवी होती. कोणाला लागेल अथवा को- णाचें नुकसान होईल, अशी वाणी त्यांच्या मुखांतून कधींच आली नाहीं. ‘बोलविता धनी वेगळाची, ' अशी त्यांची नित्य धारणा असल्याने त्यांचे भाषण नेहमीं स्फूर्तिरूपच असे, व अशा भाषणांत निघालेले विचार ' हे पहा, आज असें असें महाराजांनी सुचविलें ' असे म्हणून जणूं कांहीं एकाद्याला एकादी गोष्ट दुसऱ्यास सांगण्यास सांगावें, त्याप्रमाणे ते पुन्हां पुन्हां जसेच्या तसेच सांगत. एकादे वेळेस ' बघ महाराजांनी कसें सुचविलें ? ' असें अगदीं लहान पोरासारखा त्यांना हर्ष झाल्याचेही दिसे. श्रीमहाराजांनी आपल्या ग्रंथांत भगवत्स्फूर्तीचें 'सज्जनाची स्फूर्ति ऐसी । बाधक नव्हेचि कवणासी । परमार्थ वसिजे मानसीं । एकत्वासी साधक' असे वर्णन केले आहे. तें जणूं काय आपल्या या शिग्योत्तमालाच पुढे ठेवून केले आहे, असे वाटतें. " अगदींच विपरित अगर घातुक समजूत सोडून दिली तर कोणाची