पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नैव कुर्वन्न कारयन् अशी वृत्ति. १७९ मनांत अतिशय आदर होता, व त्यांना ते फार मानही देत, आणि होतां होईल तो त्यांचा शब्द त्यांनी कधीं खाली पडूं दिला नाहीं असे जरी होतें, तरीदेखील त्यांचे हाल होऊं नयेत म्हणूनही रोजचे म्हणणे आटोपल्याखेरीज तोंडांत कांहीही न घालण्याचा नियम त्यांनी कधीं मोडला नाहीं, अथवा अखेरच्या प्रत्यक्ष त्यांच्या विनंतिनेही आपल्या मौनाचा त्याग केला नाही. ही एकच गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगती आहे. त्यांच्या भोंवती अशा खऱ्या खोट्या देव- ड्यांचें एक कडें पडलेले दिसे, व त्यांच्या सर्व चरित्रांत त्यांची गुंतागुंत झालेली दिसे, हें खरें. परंतु तो एक सहज घडून आलेला योग होता. अण्णासाहेब हे परमार्थाच्या मागें लागले, अशी • समजूत असल्यामुळे इतर लोकांनी त्यांच्याशी बेतापुरतेंच वागणें, व अशा खऱ्या खोट्या देवड्यांनी त्यांना घेरून टाकणे साहजिकच होतें. परंतु लक्षांत ठेवण्याजोगती गोष्ट हीच आहे की त्यांनी आपण होऊन कधीं कोणास ' ये' असेही म्हटलें नाहीं; व 'जा' असेही सांगितलें नाहीं. साक्षित्वानें अखंड स्थिर राहणाऱ्या सूर्यावर अत्रें यावीत व जावीत तसा हा प्रकार अगदी शब्दशः घडला. वेदांतांतील दृष्टांत इतक्या तंतोतंत रीतीनें खरा झालेला इतरत्र कोठेंही आढळण्यांत येणें दुर्लभ आहे. जी गोष्ट माणसांविषयीं तीच गोष्ट मनोविकाराविषयों कोणच्याही मनो- विकाराला बळी पडणें त्यांना कधींच ठाऊक नव्हतें; त्यामुळे त्यांच्या सर्व क्रिया प्रसंगास जशा हव्या तशा सहज रीतीनें घडत, व त्यांच्या शक्तीचाही फाजील व्यय न होता, त्यांच्या धोरणाप्रमाणें सारी कामें घडत. यामुळेच वर सांगितल्याप्रमाणे विशेष प्रकारचें कर्मकौशल्य त्यांच्या वागण्यांत सर्वत्र आढळून येतें. प्रकृतीनें नियोजिल्याप्रमाणें स्वकर्मबद्ध जीवास प्रारब्धभोग भोगीत असतां हरएक प्रकारच्या क्रिया करणेंच भाग पडतें. तेव्हां त्या क्रिया मुकाट्यानें परंतु अशा कांहीं युक्तीने करावयाच्या की त्यांचा शक्य तितका अधीक उपयोग आपल्या ध्येयाकडे करून घ्यावयाचा. या शहाणपणालाच भगवान् श्रीकृष्णांनी 'योग' अथवा ' कर्मकौशल्य ' असे म्हटले आहे, आणि ही गोष्ट मनोविकार ज्याच्या स्वाधीन आहेत, व त्यांच्या आहारी कधीही जात नाहीं त्यासच शक्य आहे. प्रत्येक गोष्टींतील असे वागण्याच्या हातो- ·टीलाच त्यांनी ' युक्तता' असे म्हटले आहे, व त्याला अनुसरूनच श्रीमहा-