पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 ' साक्षात्परिचय ' • नाचा खुलासा कर्धीही करीत नसत. त्यामुळे त्याची कार्यकारण-संगति ज्यान त्यानें आपापल्या परीनें वाटेल तशी लावून घ्यावी, असे होई. त्याला कधों त्यांनी खोडूनही काढले नाही. परंतु भाषणाच्या बाबतीत मात्र असे नव्हतें. उलट अत्यंत क्षुल्लक व लहानसान गोष्टीपासूनही ' हा माझा स्वतःचा अनुभव, व हैं मला अमक्या अमक्या वेळी असे सांगितले. ' असें नुसते तारीखवारच नव्हे तर जवळ जवळ तास घटकांसह देखील सांगत. कोणाही मनुष्याला उगीच वाईट समजावयाचें नाहीं, व प्रत्यक्ष पुरावा असल्याखेरीज म्हणावयाचें नाहीं, असा त्यांचा नियम असल्यामुळे कोणी कांहीं सांगितल्यास त्याचें ऐकून ठेवावें, व प्रसंग आला असता, त्याच्या नांवानेंच जसेच्या तसें सांगावें, एवढेच ते करीत. त्याची शहानिशा करीत बसण्याची त्यांना कधीं आवश्यकता भासलीच नाही, आणि तितका वेळही पण त्यांना नव्हता. बरें, पुन्हा त्यी गोष्टी अशा होत्या, की त्यांपासून जें सारभूत तत्त्व निघे, तें आचरण्यापासून कधी कोणाचें अकल्याण होणे शक्य नव्हतें. अशा स्थितीत इतिहाससंशोधनाचें फाजील महत्त्व त्यांनी बाळगिले नाही, यांत विपरीत तें काय झाले ? त्याचप्रमाणे देवधर्माच्या व महाराजांच्या नांवाखालीं, लोक त्यांना वाग- ण्यास लावीत, अगर त्यांच्यापासून वाटेल तो मतलब साधून घेत, हाही आरोप वृथा आहे. देण्याजोगतें जें कांहीं जवळ असेल, तें त्यांनी कधींच कोणास नाहीं म्हटलें नाहीं, अगर स्वतःच्या चारित्र्यास धक्का बसणार नाहीं, असें जें कांहीं करितां येण्याजोगतें असेल, तें कोणाकरितां करण्यास त्यांनीं कधींही मागे घेतलें नाहीं; मग तो एकदा घोडेशास्त्रयासारखा अतिरुद्री ब्राह्मण असो,अगर निळकंठराव*सहस्त्रबुद्धधासारखा एकादा शिखासूत्रत्यागी पीर असो. तेव्हां हा त्यांच्या स्वभावांतला Weak point आहे असे म्हणण्यांत काय जीव आहे ? श्रीभक्त तीर्थस्वरूप गं. भा. गयाताई यांच्याविषयीं त्यांच्या

  • हे परोपकारी गृहस्थ पुण्यास सुप्रसिद्धच आहेत. वेदमार्गातील आचार

धर्माशी यांचा कितीहि विरोध असला तरी हे कट्टे शंकरमतानुयायी व आचार्य भक्त आहेत. परोपकार परायणता आणि मनःपूतं समाचरेत् असा यथार्थ स्वभाव यामुळे अण्णासाहेबांचा यांच्यावर लोभ होता.