Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोळेपणा नव्हता, संग्राहकता होती. १७७ धर्माच्या नांवाखाली त्यांच्याकडून वाटेल तसा मतलब साधून घ्यावा असे उद्गार काढतांना प्रत्यक्ष त्यांच्या चिरंजीवांसारखी निकट परिचयाचीही मंडळी आढळतात. ही एक त्यांच्या स्वभावांतील मोठीच दुर्बळता होती, ( Weak point ) असें, त्यांच्यावर निःसीम भक्ति आहे, असे समजणारे भक्तही म्हणतात. परंतु एक गोष्ट त्यांच्या लक्षांत येत नाही. महाराजांनी प्रत्यक्ष जें कांही सांगितले असेल, मग तें भोजनानंतर लघुशंका करण्यासारखा एकादा आरोग्याचा नियम असो, अथवा श्रीतुकोबारायांच्या अभंगांतील 'कामकर्द ' शब्दासारखा साधा शब्दपाठ असो, तो त्यांना केव्हांही शिरसाधंद्यच असे; आणि तें ठीकच होतें. कारण सर्व तऱ्हेनें होतां होईल तो धर्ममर्यादा सांभाळण्याचा त्यांचा कटाक्ष होता. श्रीमहाराजांना ते नुसते गुरूच नव्हे, तर ' देवांचाही देव' असे म्हणत असत, व त्यांच्यापासूनच त्यांनी स्वतःच्या अनन्य शरणागतीस आणि अहंकारत्यागास सुरुवात केली होती. हा शिष्य- धर्म त्यांनी आमरणांत कडकडीतपणे आचरिला, व त्यामुळे महाराजांचे कोणी नुसतें नांवही काढलें तरी, त्यांच्यांत भक्तिभाव जागृत होत असे व तो प्रसंग, ती वस्तु अगर तो माणूस यांच्याविषयी त्यांना साहजिकच मोठा लोभ वाटे. असे जरी होतें, तरी देखील उगीच महाराजांनी सांगितले म्हणून कोणी कांही सांगितलें, म्हणून ते आपल्या स्वतःच्या ठराविक क्रमांत बदल करून त्याच्यामागें लागत असे कधी घडलें नाहीं, अथवा असा माणूस व त्याच्या गोष्टी जरी त्यांना आवडत तरी त्याचे गुणावगुण त्यांच्या नजरेंतून कधीं सुटले आहेत, व त्यामुळे त्यांची न कळत कधीं फसगत झाली आहे, असे कधींही घडलें नाहीं. त्यांचा स्वभाव कमालीचा सर्वसंग्राहक असे, त्याप्रमाणेच महाराज व देव- धर्म यांच्या नांवाखालींही कोणी कांही सांगितलें अगर केलें, तर तें ते आपल्या संग्रही ठेवीत, परंतु अशा परोक्ष माहितीवर त्यांनी स्वतः कांहीं केलें नाहीं, अगर दुसन्यास करावयासही सांगितले नाही. देवभोळेपणाच्या असंभाव्य वाट- णाऱ्या कित्येक गोष्टी त्यांच्या सांगण्यांत नेहमी येतं, व त्यामुळे कांही " सत्य- मार्गी " लोकांस येवढा प्रचंड बुद्धिमान् थोर पुरुषही अशा बाबतीत केवळ निर्बुद्ध व्हावा, याची मनापासून कींव येई. परंतु अण्णासाहेब यांच्या भाषणांत व वर्तनांत एक ठराविक नियम असा होता कीं ते आपल्या कोणत्याही वर्त- १२