Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ ' साक्षात्परिचय ' विलक्षण योगायोग तीं चिलें उतरतांना सहज घडून आला आहे. डेक्कन कॉलेजांतील जरीच्या टोपीचा व ऐटबाज पोषाकाचा फोटो, १९०१ सालीं रा. माधवराव बापटांनी घेतलेला लेव्ही नंतरचा फोटो, श्री. भ. दादा दांडेकर याचे वरोवर घेतलेला माळेसारख्या उपरण्याचा फोटो, रा. ओकांनी घेतलेला तिरसट मुद्रेचा उभा फोटो, व त्याप्रमाणें हातानें उतरलेली तसबीर, गायक- वाडवाड्यांतील लोकमान्यांच्या भाषणाचे अध्यक्ष असतांना घेतलेला फोटो, चित्रमयजगत्चें पेन्सिल स्केच, व शेवटी आळंदीस घेतलेला रा. कवड्यांचा फोटो, हे सर्व पाहिले असतां त्यांच्या स्वभावांतील या निरनिराळ्या छटा, व कमलपत्राप्रमाणे त्यांत अलिप्तता दाखविणारा 'दृष्टी माजी दृष्टी नाहीं, ' अशा प्रकारचा कांहींसा भाव, हीं स्पष्टपणे दिसून येतात. कदाचित् त्यांच्या आंतर- वृर्द्धाचा क्रमही त्यांत सांपडूं शकेल. अशा त-हेची वस्तुस्थिति असतांही ते व्यवहारांत पुष्कळ प्रसंगी दुस- प्याच्या तंत्राने वागत असल्याचे दिसत, आणि विशेषतः देवधर्माच्या व महा. राजांच्या गोष्टी आल्या म्हणजे तर त्यांना स्वतःची बुद्धि अगदींच नसल्या• सारखें होऊन, ते कोणाही माणसाच्या आहारी जात, अशी पुष्कळांची सम- जूत आहे. परंतु त्यांच्या चरित्राचें बारीक निरीक्षण केले तर ती अगदी चुकीची आहे असे आढळून येतें. भूतमात्रांवरील त्यांच्या प्रेमामुळे माणसा- गणीक त्याचे लाड पुरवावयाचें त्यांना जणूं काय एकाद्या एकुलत्या मुलाच्या आईपेक्षाही जास्त वेड होतें. कोणाच्या अंतःकरणास धक्का बसूं नये, आणि अगदींच अपायकारक गोष्ट नसेल, तर होतां होईल तो त्या माणसाच्या पद्धतीने, त्याच्या अंतरात्म्यास तृप्ति व्हावी, असें त्यांस वाटत असे; व त्यामुळे ते माणसाच्या थोडेसे आहारों गेल्याचे भासत. परंतु अशा रीतीनें कितीही वागत असतां, स्वतःच्या वर्तनाच्या कोणत्याहां तऱ्हेच्या मर्यादा त्यांनी कधींच पालटल्या आहेत अगर त्यामुळे त्यांच्या वर्तनांत कांही अपवाद उत्पन्न झाला आहे, असें कधीच झाले नाहीं. नाना प्रकारचे शौक ज्याप्रमानें त्यांनी अमर्यादपणानें पुरवून घेतले, त्याचप्रमाणे स्वतःच्या स्वाधीनतेनेंच हेंही वेड त्यांनी सांभा- ळलें होतें. अशीच गोष्ट महाराजांच्या संबंधीही आहे. अण्णासाहेबांना काय, कोणीही येऊन महाराजांच्या नांवावर कांहीही सांगावें, व महाराजांच्या आणि देव.