Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची छायाचित्रे. कच वाढत असे. आपल्या प्रत्येक क्रियेमध्ये कांही उपयुक्तता असावी असें • त्यांचें नेहमींचें धोरण असल्यामुळे, अशी उपयुक्तता त्यांच्या दृष्टीनें ज्या बोलण्यांत व वागण्यांत नसे, तसें बोलणें व वागणें, अथवा तशी माणसें यांचा प्रसंग उपस्थित झाला असतां चिडखोरपणानें अथवा तिरसटपणानें एकदम तटका तोडून टाकण्याची त्यांना संवय होती; आणि जरी ते अत्यंत प्रेमळपणानें व कनवाळूपणाने वागत असत, तरी उगीच कोणचीही गोष्ट चिकटून घेणें अगर वाई देणे, त्यांना केव्हांही आवडत नसे. त्यामुळे प्रथमतः माणसांस त्यांचा स्वभाव उग्र व कठोर भासत असे व त्यामुळे ती बिचकून जात. परंतु थोडासा कालावधि गेला, म्हणजे या फण- साच्या आंतील गन्यांची गोडी माणसांस लागूं लागे. लोकसमाजांत वावरत असतां कितीही मोठा मनुष्य असला तरी त्याच्या अंतःकरणांतील कित्येक मानवी प्रवृत्तींना पोषक अशी परिस्थिति थोडीबहुत त्याला हवी तशी मिळते, व अशा प्रसंगी तो थोडा तरी स्वतःस विसरून जातो. या दुर्बलतेचा फायदा घेऊन सामान्य माणसांना थोर पुरुषांस चिक- टतां येतें, व उलट पक्षी या थोर पुरुषांच्या चरित्रांत त्या चिकटण्याचा परिणाम, अर्थातच वाईट परिणाम, थोडा तरी आढळून येतो. अशा प्रकारें आत्मविस्मृति होऊन दुर्बलतेच्या आहारी निमिषभरच कां होईना, पडल्याचें एकही उदाहरण अण्णासाहेब यांच्या आयुष्यांत आढळेल किंवा नाहीं, कोण जाणे. त्यामुळे त्यांना आपण होऊन, अगर सहजासहजी चिकटणें कोणासही शक्य नव्हते. जे कांहीं दोन चार जीव त्यांना चिकटल्याचे भासतात, अगर कोणाचा कांहीं थोडा फार लळा दिसतो, तो त्यांनी स्वतःच लावून घेतल्या- मुळेच आहे. यामुळे माणसांच्या अखंड सहवासांत राहूनही, आपणच उठ- विलेल्या कल्लोळांत, स्वतःच्या इच्छेनें विहार करणाऱ्या समुद्रांतील गजराजा- प्रमाणे त्यांची एकाकिता अथवा स्वातंत्र्य हें नेहमीं अभंग असे; व अशा प्रकारच्या जललीलेकडे ज्या एका प्रकारच्या संतुष्ट व कौतुकाच्या नजरेनें तो गजराज पाहील, तशाच तऱ्हेचें कौतुकपूर्ण अतिशय कोमल, व दयार्द्र असे. स्मित, व त्याला अनुरूप अशी दृष्टि, त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दिसत असत त्यांची उपलब्ध असलेली निरनिराळ्या काळची छायाचित्रे पाहिली असतां, त्यांच्या स्वभावांतील वरील सर्व छटांची साक्ष दिसून येते; असाच कांहीं