Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तीव्र दृष्टि. दहा दहा वर्षांच्या अवधीनंतरही अण्णासाहेब यांनी भाकीत केल्याप्रमाणेच त्या माणसाचा स्वभाव व्यक्त होऊन अण्णासाहेब यांच्या परीक्षेची मौज वाटे. अर्शी पुष्कळ उदाहरणे आहेत. यांची दृष्टांही फार वारीक व दूरचें पाहणारी होती. क्राफर्ड मार्केटचे मधले घड्याळ, तेथून सुमारें मैल सवा मैल अंतरावरून पाहून त्यांत किती वाजले आहेत हें ते सांगत असत ! या अशा दृष्टांचा रोग्यांची परीक्षा कर- तांना त्यांना फार उपयोग होत असे. कित्येक वेळेला एकही प्रश्न विचारल्या वांचून पुढें वर्षांवर्षांनी देखील प्रगट होणारे महारोगासारखे रोगही आधींच सांगितलेले पाहून पुष्कळांना आश्चर्य वाटे. परंतु अशा गोष्टी ते कांहीं अति- मानसतेनें करीत असे मात्र नाही. केवळ सूक्ष्म अवलोकनानेंच त्या त्यांना अवगत होत. एकदां एक गृहस्थ अण्णासाहेब यांच्याकडे येऊन कांहीं विचारूं लागला. नेहमीप्रमाणें त्याच्या कडे उगीच वेड्यासारखें कांहीं वेळ पाहिल्या- वर अण्णासाहेब यांनी त्याला सांगितले की “तुला महारोग होणार आहे, आतां - पासून काळजी घे ! " हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलें; कारण तसा कांहीं प्रकार असल्याचा नुसता संशय येण्याचेंही कारण नव्हते. त्यावर हें कशा- वरून सांगतां ? " असे कोणी विचारल्यावरून त्यांनी त्या सर्वांना त्या गृह स्थाचा चेहरा नीट पहावयास सांगितले. तरीही कोणाच्या लक्षांत येईना. तो गृहस्थ नुकताच उन्हामधून आला होता, व त्याचा चेहरा घामानें डब- डवलेला होता. अशा स्थितीत कांहीं सूक्ष्म जागा मात्र अशा होत्या कीं तेथें मुळींच घाम येत नसून उलट त्या कोरड्या होत्या. ही गोष्ट लक्षांत आणून देऊन अण्णासाहेब यांनी आपले निदान सर्वांस समजावून दिले. अशा अनेक गोष्टी घडत. 66 एकदां एका गृहस्थाच्या कांहीं कामांत अतिशय विश्वासू माणूस म्हणून त्याच्या एका स्नेह्यास कोठें पत्र देऊन पाठवावयाचें होतें. हा स्नेही त्याच्या' मंडळीत मोठा देशाभिमानी, व शूर समजला जात असे. अण्णासाहेब यांनी त्यास पूर्वी कधीं पाहिलेही नव्हतें. अण्णासाहेब यांच्याकडून पत्र घेण्याकरितां ज्यावेळेस तो पुढे आला, त्यावेळी अण्णासाहेब यांनी त्याच्याकडे फक्त एकवार नीट पाहिलें, व लागलेच, आपला बेत फिरवून हातांतील पत्र फाडून टाकलें ! या त्यांच्या करण्याचें त्यावेळी सर्वांसच नवल वाटले, परंतु १५ वर्षांनंतर एका