Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ 'साक्षात्परिचय कुन्हाडीच्या भोकांत मोठ्या ऐटीनें बसलेल्या या दांड्यास पाहून अण्णासाहेब यांच्या परीक्षेचें प्रत्येकासच आश्चर्य वाटले. त्यांची इतर इंद्रियेंही अशाच प्रकारची तिखट आणि अखेरपर्यंत बळकट होती. फक्त दांत मात्र लौकर पडले. शेवटच्या १०।१२ वर्षांमध्ये एकही दांत उरलेला नव्हता. परंतु त्यामुळे शब्दाच्या उच्चारांत यत्किंचितही व्यंग उत्पन्न न झाल्यामुळे, आणि त्यांच्या ठिकाणी असलेल्या एका विशेष प्रकारच्या • कर्मकौशल्यामुळे खानापानादि व्यवहारही अशा रीतीनें होत की, त्यांना दांत नाहींत, हें सांगूनही खरें वाटत नसे! दांत लोकर पडण्याचे कारण ते असे • सांगत की मद्रासेस असतां, त्यांना अठ्ठावीस महिने रोज सारखें रक्त पडत असे, त्यामुळे जी क्षीणता आली तिचा परिणाम दातांवर होऊन दांत गेले. यांचे भव्य कपाळ, व एकंदर मस्तकाचा आकार, यांत कांहीं विशेषपणा होता. तशा प्रकारची ठेवण रोमन लोकांच्या कांहीं पुतळ्यांत सांपडते. • सामुद्रिक शास्त्रास अभिप्रेत असलेल्या साडेतीन वळ्या, यांच्या कपाळावर पूर्ण होत्या, आणि नाक तर हुबेहुव शिवाजी महाराजांच्या नाकासारखे होतें. अलीकडच्या काळांत शीतोष्णांच्या माऱ्यानें त्यांचा चेहरा किंचित् काळवंडला होता, व अनशन, परिश्रम आणि झोपेचा अभाव इत्यादिकांमुळे शरीर आटून त्वगस्थिमात्रच राहिले होते; परंतु एकंदर शरीरावर असलेले तेज मात्र विलक्षण होतें, व शरीराची तरतरी तर जास्तच वाढली होती. कांहीं क्वचित् थोडे प्रसंग टाकले तर, त्यांची मुद्रा नुसती प्रसन्नच नव्हे, तर आनंदित दिसे. विषय प्रतिपादन करतांना कोटिक्रम, विनोद, वगैरे करून, स्वतः यथास्थित हंसण्याची, व त्यामुळे बाजूच्या मंडळींच्या मना- • वरील सर्व तऱ्हेचा ताण निघून जाऊन त्यांनीही हंसण्याची, त्यांना संवय होती. अशा वेळी त्यांच्या मुखावरील एकाद्या लहान पोरासारखा सरलभाव पाहून फार आश्चर्य वाटे. क्वचित् कांहीं प्रसंगी मात्र त्यांचा चेहरा उदास व चिंतामग्न असा दिसे. त्यांच्या मूळ तापट स्वभावामुळे निरहंकारपणानें बोलतांना लहान पोरांप्रमाणेच मधून मधून थोडेसें चिडण्याची त्यांना संवय होती. आणि भोंवतालची मंडळी जर अधिक तरुण असलीं, अगर आम्हीं मुलेंच जवळ असलो, तर ते अधिकच चिडल्यासारखें करून एकाद्या लहान मुलासारखाच वाद घालीत. परंतु त्यामुळे सहवासाची गोडी उलट अधि-