पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ साक्षात्परिचय ' प्रभा मिळून गेलेली, अशी ती विलक्षण मूर्ति पाहिली म्हणजे पाहणारास · क्षणमात्र एक विलक्षण प्रकारचा आदर, पूज्यभाव व भीति उत्पन्न होत असे. परंतु त्यांतल्या त्यांतच, प्रखर तेजाच्या जोडीलाच सौम्यपणाचा भास होऊन आप्तपणा उत्पन्न होई, व मोठा संतोष वाटे. एकादा विजेचा लोळ आपली प्रखरता कायम ठेवून, फक्त दाहकता मात्र टाकून देईल तर तो जसा दिसेल, तशीच पुष्कळ अंशी, यांच्यासंबंधानें स्थिति होती. रावापासून रंकापर्यंत, आणि लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकासच, यांच्या ठिकाणी, असलेल्या प्रखर तेजाचा भास होत असे. परंतु त्यांतील दाहकता अजीबात 'निघून गेली असल्यामुळे, मोठा आल्हाद होऊन 'तत्त्वालोकनिरस्त मोहतमसां अध्यात्मविद्याजुषाम् । अत्रब्रह्मविदां निसर्गमधुरं जागर्ति सौम्यं महः ' असें त्याच्या तोंडून बाहेर पडे. अलीकडे वृद्धादपकाळामुळे ते किंचित् ठेंगणें दिसत असत, परंतु त्यांच्या पूर्व वयांत पाहिलेले लोक असे सांगतात की त्यांची उंची भरपूर म्हणजे जवळ जवळ पावणे सहा फूट होती, व त्या माना- नेच त्यांचे इतर सर्व अवयवही पुष्ट व रेखीव होते. त्यांच्या सर्व इंद्रियशक्ति मुळापासूनच अतिशय प्रखर होत्या, व शेवट- पर्यंत त्या तशाच राहिल्या होत्या. डोळे विस्तृत व मोठे नव्हते; परंतु अतिशय पाणीदार व शरद् ऋतूंतील चंद्राच्या कोरेप्रमाणे लकलक करीत असत. आणि नजर मोठी तीव्र, भेदक, परंतु स्थिर व गंभीर अशी होती. कोणीही मनुष्य त्यांच्याकडे आला असतां, त्याच्याकडे आपल्या भेदक दृष्टीनें सारखे दोन दोन मिनिटें टक लावून पाहण्याची त्यांना संवय होती; आणि त्या एकसारख्या दृष्टीपुढे, कसाही मनुष्य असला, तरी तो विरून जात असे, व त्याच्या अंतःकरणाचा सहजभाव जो कांहीं असेल, तो अखेरीस त्याच्या चेहऱ्यावर त्याची इच्छा नसतांही प्रतिबिंधित झाल्याखेरीज राहत नसे ! एकाद्या विशाल समुद्राच्या तळाशीं हट्टानें दडून बसलेल्या मगराला ढोसून जसें वर काढावें, त्याप्रमाणें अनेक कृत्रिम भावांच्या अगदर्दी तळाशीं लपून बसलेल्या मनुष्याच्या खऱ्या स्वभावाला अशा रीतीने उघडा पाडून, ते त्याची परीक्षा करून टाकीत, व त्या धोरणानेंच पुढे त्याच्याशी वागत; आणि एक किंवा दोन मिनिटांच्या अशा रीतीने झालेल्या मतांत पुढें जन्मभरही कधीं त्यांना फरक करावा लागल्याचे उदाहरण नाहीं. उलट पांच पांच ८