पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पटवर्धनी पंचाग. १६१ असणाऱ्या राशीचा व नक्षलाचा बोध त्या आरंभाच्या दिवशी असणाऱ्या पौर्णि- मेच्या मध्यरात्रीस आकाशांत चंद्रसहित असणाऱ्या मृगनक्षत्रावरून झाला. म्हणून धनुर्मासाचें नांव मार्गशीर्ष असे झाले. या दिवसापासून धनुर्मास किंवा मार्ग- शीर्षमास व उदगयनाचा उत्सव म्हणजे देवदिपाळी करण्याचें शास्त्र झाले व जरी उदगयन धनुराशीत नसते तथापि मूळाचें स्मरण राहण्याकरितां तो उत्सव दरवर्षी करतात व नैवेद्यास खिचडी करितात. काल रात्री म्हणजे ता. ११- १२-१९०४ रविवासरीं श्रींनी स्वप्नांत दांडेकर यांस उत्तरायण म्हणजे धनु- मस लागला म्हणून खिचडीचा नैवेद्य करीत जा आतां म्हणून सांगितले व आज आम्ही सारभात खाऊं कारण तुझा पाठ चालला असतां परान्न नको असें बोलले. केरोपंती पंचांगांत धनुर्संक्रांत शनिवारी ता. १० परवां घटि ५७/२० वेळेस लागली व धोंडूच्या बापाचें श्राद्ध आज सोमवारी ता. १२- १२-१९०४ आमचे येथें होतें. म्हणून श्राद्धान्न किंवा परान्न नको. यावरून केरोपंती पंचांग खरें व स्वप्नही खरें. कारण श्राद्धाची माहिती मला व दांडेकर यांस नव्हती. म्हणून केरोपंती पंचांग व नक्षत्रघटी खरें. " केरोपंती पंचांगाच्या खरेपणाविषयीं असाच एक गमतीदार दाखला आण- खीहि पहावयास सांपडला. धुळे येथील श्रीसंस्थानचे अधिकारी श्रीभक्त वासु- देवबुवा रुद्र यांच्या चिरंजीवांचे लग्न १९११ साली झाले. त्या वेळीं तिथि निश्चयाच्यासंबंधीं विचारतां श्री० अण्णासाहेब यांनी सांगितलें कीं, महा- राजांस चिठ्ठया टाका व त्यांच्या आज्ञेप्रमाणे करा. त्या वेळीं कांही सोयीवार दिवस पाहून चिठ्ठया टाकल्या. त्यांत काय चूक झाली असेल ती असो. परंतु चिठ्ठीमध्यें जो दिवस निघाला, त्या दिवशी पंचांगांत पहात असतां मुहूर्तच नाही असे आढळून आलें. तेव्हां आतां काय करावें अशी वासुदेववुवास पंचा- ईत येऊन पडली. शेवटी तें प्रकरण श्री० अण्णासाहेब यांचेकडे आले तेव्हां त्यांनाही विचार पडला. महाराजांची चिठ्ठी आली आहे तेव्हां त्या दिवशीं मुहूर्त असला पाहिजे खास. तेव्हां लग्न त्याच दिवशीं लावावयाचें असे. त्यांचें ठाम मत होतें. महाराजांची आज्ञा शास्त्राला सोडून कधीं येणार नाही हॅहि उघड होतें, परंतु पंचांगांत त्या दिहशीं मुहूर्त नव्हता हेंही खरें. तेव्हां त्यांच्या लक्षांत आले की, हा पंचांगांचा घोंटाळा आहे. म्हणून त्यांनी ११