Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

· १६० निर्याण. 1 त्यांना विचारलें होतें कीं ' हैं असे चालणार तरी किती दिवस.' त्यावर हंसून त्यांनी सांगितले की, 'काय मूर्ख आहेस आतां कसले किती दिवस झालें आतां.' आळंदीस जावयापूर्वी दोन दिवस आधी सोमवारी रात्री आपण होऊन ते मोकळेपणाणे रात्रभर बोलत बसले व त्यावेळेसही 'याचें कारण पुढे कळेल' म्हणून त्यांनी बोलून ठेविलें. नंतर ते आळंदीस गेले व रीतीप्रमाणे उत्सवहि पार पडला. प्रक्षाळपूजा झाली म्हणजे परतावयाचें परंतु उत्सवास आलेल्या मंडळींतून एकदोघांवर प्लेग महाराजांची कृपा झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीस आराम पडेपर्यंत तेथें राहणे भाग होतें. श्रीअण्णासाहेब यांचा आळंदीचा मुक्काम म्हणजे खरोखरच आनंदाची दिवाळी होती. भोवतालचे लोकांस सूर्य कोणीकडे उगवला व कोणीकडे मावळला याचेही भान नसे. श्रीअण्णासाहेब यांस तर तर प्रसाद घ्यावयास बदुतकरून उजाडत असे. हास्यविनोद, मियाचा काढा, महाराजांच्या गोष्टी आणि नानाप्रकारची चर्चा यांच्याखाली दिवसचे दिवस निघून जात. या वेळीं तर बहुतकरून उजाडल्यावरही प्रसादस बसावयाची वेळ येई. त्यामुळे पौत्र वा ४ स काय करावें असा थोडा प्रश्न पडला. कारण उजाडल्यावर आतां चतुर्थी आहे म्हणून ते प्रसादास न बस ण्याचा संभव होता. तेव्हां श्रीभक्त माधवराव यांनी नित्याप्रमाणे प्रसादाचें भात व दाळवांगे आणि वऱ्याचे तांदूळ व शेंगदाण्याची आमटी असे दोनही तयार ठेवून पाने मांडलीं. श्री० अण्णासाहेब यांस संकष्ट चतुर्थीचे व्रत जन्मा- चेच म्हटले तरी चालेल. परंतु आश्चर्याची गोष्ट ही कीं, “ तुमची कालची चतुर्थी खोटी आमची आज खरी" अशी रा. नारायणशास्त्री यांची नेहमी- प्रमाणचें थट्टा करीत त्यांनी दाळवाग्याचाच प्रसाद घेतला. श्री० अण्णासाहेब यांचा भरंवसा पटवर्धनी पंचांगावर जास्त होता. याचे एक कारण आपल्या गुरूविषयी आदर है तर होतेच. परंतु त्या वेळेस तरी इतर पंचागाच्या मानानें पटवर्धनी पंचगांतील तिथी व नक्षत्रें जास्त बिनचूक आहेत असा महाराजांनी त्यांना दाखला दिला होता. याविषयी त्यांनी स्वतःच असे लिहून ठेविले आहे. "मूळ ज्योतिषविद्या निघून नक्षत्रांची नांवें प्रसिद्ध करण्यांत आली. त्या वेळी ज्या नक्षत्रांत सूर्य असून उत्तरायणही लागले होते, त्याचें नांव मूल (आरंभ ) असे प्रसिद्ध करण्यांत आले व त्या नक्षत्राशी संबंध असणाऱ्या राशीचें नांव आकृतीवरून धनुर असे पडलें, सूर्यामुळे अदृश्य