Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्याण. पुण्यांस पत्र लिहून पटवर्धनी पंचांग बोलाविलें. ते आल्यावर त्यांत पहातात तों केरोपंती नक्षत्रतिथीप्रमाणें त्या दिवशीं उत्तम योग होता, तेव्हां सर्वां- सच आनंद झाला आणि त्याच सुमुहूर्तावर अखेरीस तें लग्न लाविलें. तेव्हां- पासून नारायणशास्त्री वगैरे जुन्या लोकांशी बोलतांना ते नेहमीं विनोदानें ‘ पटवर्धनी उर्फ खरें पंचांग व दुसरें खोटें पंचांग' असे म्हणत असत. त्यांची स्वतःचीं कामें केरोपंती पंचांगाप्रमाणेच ते करीत असत. आळंदीस ते आले म्हणजे हा वाद व विनोद नेहमींच चालत असे. तसाच याही वेळेस चालला होता. या पंचांगांतील वादासंबंधी त्यांनी कधीं विशेष आग्रह धरला नाही. परंतु अलीकडील सररास सर्व पंचांगांतील एका घोटाळ्यासंबंधी मात्र ते केव्हाही प्रसंग निघाला असतां मोठ्या आग्रहपूर्वक सांगत असत. हा घोंटाळा दोन एकादशाच्या निर्णयाचा होय. सामान्यतः भागवत व स्मार्त अशा दोन एकादशा असतात अशी लोकांची समजूत आहे. जुन्या काळी कांही पंचांगांत माध्व एकादशीहि लिहिलेली असे. मध्यंतरी कांही तरी घोटाळा होऊन माध्व व भागवत या दोनही एकादशा एकच समजण्यांत आल्या व त्यांतील भेद नाहींसा होऊनू एक मोठा घोंटाळा उत्पन्न झाला. स्मार्तं एकादशीसंबंधी त्यांचें असें म्हणणें होतें की आम्ही जे स्मृतिप्रमाण लोक त्या एकादशी करणाऱ्या सर्वांना ती करणे अवश्यच आहे. परंतु जे भागवत असतील त्यांनी खरोखर पहातां दोन्ही एकादशा केल्या पाहिजेत. केवळ सूर्यदृष्ट तिथि घ्यावयाची एवढ्याच आग्रहानें असा प्रकार होतो की आधल्या दिवशी फक्त केवळ सूर्यदृष्ट नसून सबंध दिवस जरी एकादशी असली तरी त्यादिवशीं यथास्थित खाणेंपिणें होतें आणि दुसऱ्या दिवशीं केवळ सूर्यदृष्ट आहे म्हणून उपास केला जातो व त्रयोदशीस पारणा करण्याचा प्रसंग येतो. जे माध्व आहेत त्यांची गोष्ट वेगळी. त्यांचे मुळीं शास्त्रच ' उपोष्यात् द्वादशी शुद्धा त्रयोदश्याम् तु पारणा असें आहे व त्याचा उद्देश धडधडीत प्रदोष हैं शिवव्रत वुडवावें असा आहे. त्यांचा प्रश्न नाही. परंतु आपण जे शांकर मतानुयायी पंचोपासक त्यांना शिव व विष्णु ह्रीं दोन्हीं देवतें सारखींच पूज्य असल्यामुळे अशा रीतीनें दोषास फांटा देणें हें बरोबर नाहीं. म्हणून ते नेहमी, भागवती व माध्व व असा भेद न ठेवतां उपोष्यात् द्वादशी शुद्धा अशाच प्रकारची भागवती एकादशी लिहि- ,