पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्याणाची सूचना. १५९ सांगून भावी प्रसंग उघड उघड त्यांनी सूचित केला. असे होतां होतां आळं- दांस जावयाची वेळ आली. या वेळेला आळंदीस प्लेग असून विरूपाक्षमठाचे शंकराचार्य स्वामी बोधानंद भारती यांचा मुक्काम उत्सवात आळंदीस व्हाव- याचा होता म्हणून श्री० अण्णासाहेबांस थोडें लवकर जावयाचे होते. बोधा- नंद भारती व श्री० अण्णासाहेब यांचा चांगलाच पूर्वपरिचय होता. हे स्वामी केरू नानांचे विद्यार्थी असून गणित व ज्योतिःशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी नानांजवळ केला होता. त्यांच्या मनांतून महाराष्ट्रांत एक संस्था काढून कांहीं देश कल्याणाच्या गोष्टी करावयाच्या होत्या व तेवढ्याकरितां ते श्री० अण्णासाहेबांकडे आले होते. गणितशास्त्राच्या साह्यानें वेदांतसिद्ध करून दाख चावा व पुराणांतली व आमच्या शास्त्रांतली कित्येक स्थळे गणितशास्त्रदृष्टय उलगडून दाखवावी असाही या संस्थेचा एक हेतु होता. या सर्व गोष्टींचें महत्त्व श्री० अण्णासाहेब यांचेपाशी केव्हढे होतें हैं कोणी सांगावें ? एव्हढे मात्र खरें की आपल्याकडे आलेला इसम ह्या नात्यानें स्वामींची जी व्यवस्था ठेवावयास पाहिजे होती ती कशी ठेवली जाईल याची ते थोडीशीशी काळजी करीत व ते पाहून नवलही वाटे. कारण त्यांना चिंता अशी कोणत्याच प्रकारची करतांना कोणी कधीं पाहिले नव्हतें. ५१६ महिन्यापूर्वी श्रावणांत पोटांत शूळ होऊन ते दोन तीन दिवस अत्यवस्थ झाले होते. त्या वेळी एका गृहस्थांचे अपीलाचें काम त्यांनी घेतले होते व त्याची मुदतही अगदींच भरली असल्यामुळे तें ताबडतोब रवाना होणें अगदी अवश्य होतें. हैं अपील सांगतांनाहि ते आपल्या हातून मुदतीच्या आंत कसे जाईल अशी तें जरा चिंता दाखवीत. अपील रवाना केले तेव्हां त्यास मोठे समाधान वाटलें व दुसरेच दिवशी ते आजारी पडले. तशींच चिंता ते यावेळीहि दाखवीत. परंतु ती वरवरच असे. आंत तर त्यांची आनंदवृत्ति अधिकच उत्कट झाली असावी. आळंदीस जावयापूर्वी एक दिवस घरखर्चासंबंधी वगैरे गोष्टी काढून मी चगैरे करूं लागले. त्यांच्या विश्वासामुळे त्यांना फलही मिळू लागलें. होतां होतां खुद्द बादशहाचीही स्वारी स्वतःचा कांहीं नवस फेडावयास तेथे आली. तेव्हां बिरबलानें कचरी खालचें खरें दैवत काढून दाखविलें व वस्तूंत देव नाहीं भावांत आहे ही गोष्ट पटवून दिली.