Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ निर्याण. वेळींव आतां दोघांची पुन्हा गांठ पडणार नाही असे वाटले; पण जाणार कोण हाच प्रश्न होता. असो. घरांत सून लहान, कुटुंबांतले असे वडिलधारे माणुस कोणी नाहीं, असे पाहून कुळधर्म कुळाचाराची नीट माहिती व्हावी एवट्याकरितां देवदिपवाळीस नैवेद्य वगैरे किती कोगाच्या नांवाचे करावयाचे याचे त्यांनी एक टांचणच या- • वर्षी करविले, हीहि गोष्ट लक्षांत ठेवण्याजोगी आहे. या यादींत धुळ्याच्या गणपतीचेंहि नांव त्यांनी मुद्दाम घातले होते. हा गणपती कोणास फारसा माहित • नसून झाडाखालती शेंदूर लाविलेले दगड ठिकठिकाणी असतात त्याप्रमाणे कलेक्टरचे आवारांत एकीकडे पडला होता. धुळ्यास पुण्यतिथीस गेले असतां नदीवरून परत येतांना त्याला पाणी घालून त्याची पूजा करण्याचा श्री० अण्णासाहेब यांचा नेम होता. त्याची पूजा आतां आपल्या हांतून होणें • नाही असे पाहूनच त्यांनी ही व्यवस्था केली की काय कोण जाणे ! यांतील • सांगण्यासारखी गोष्ट इतकीच आहे कीं श्री० अण्णासाहेब यांच्यामागून लव करच हे गजाननमहाराज आपल्या अज्ञातवासांतून बाहेर आले. आतां त्यांचे एक मोठे देऊळ झाले असून पूजेअर्चेची स्वतंत्र सोय झाली आहे व सायंकाळीदर्शनासस्त्री पुरुषांचा समाजही बराच येतो. सारांश इतकाच कीं कोणच्याही तऱ्हेच्या दुर्बलतेमुळे नव्हे तर नैसर्गिक क्रमाक्रमानेंच आपली प्रयाणाची वेळ आली आहे असे जाणून तो सोहाळा नीटपणे पार पाडण्याची त्यांनी आधीपासूनच पद्धतशीर व्यवस्था केली होती. कार्तिकांत नित्याप्रमाणे महाराजांच्या पादुका पंढरीस गेल्या त्यांबरोबर रा० बापू पैठणकर हेहि होते; परंतु पादुकांबरोबर ते परत न येतां मागे राहिले व तेथेंच त्यांस प्लेग होऊन त्यांचा अंत झाला. त्याच वेळेस कांही लोकांच्या अंतःकरणास धक्का बसला. त्यांतच एक दिवस ' इमामच्या जूतीची ' प्रसिद्ध .*गोष्ट सांगून भावाच्या आश्रयानें देव असतो, वस्तूचें नुसतें निमित्त असते असे

  • इमामची जूती:

" भाव तोचि देव' ही गोष्ट बादशहास पटवून देण्याकरितां बिरबलानें एका जोड्यावर एक कबर बांधिली व हें माझें दैवत यानें मला भग्य आले म्हणून सर्वांस सांगूं लागला. त्यामुळे लोकांचीही श्रद्धा बसून ते तिला नवस न --