पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रायोप वेशनाचें कारण. असे म्हटल्यामुळे त्यांनी प्रायोपवेशन करून देह ठेविला अशी कल्पना निघाली; परंतु तिच्यांत तथ्य नाही. प्रायोपवेशन करून देह ठेविला नाही. देह ठेवा- वयाची वेळ आली होती म्हणून प्रायोपवेशन केले. त्यांनी उघड कोणास बोलून दाखविलें नाहीं तरी देहावसानाची वेळ त्यांना माहित असावी. वाम- नच्या मृत्यूनंतर ते जरा जास्त थकल्यासारखे दिसत होतें तेव्हां त्यांना असा उघड प्रश्न करण्यांत आला की, 'असा कांही योग आहे की काय त्यावर त्यांनी थोडेसे हंसून ' अरे महाराजांना काय केव्हांतरी अन्नपाणी द्यावयाचें, तें आतांच देतील' असे त्यांनी उत्तर दिले. परंतु त्या वेळेपासून ते आपल्या बोलण्यांत व कृतींत थोड़ें दिवस राहिले असल्याचें केव्हां केव्हां दर्शवीत. , 22 १९१५ सालच्या गणेशचतुर्थीच्या आधल्या दिवशी त्यांनी अगर्दी स्पष्ट- पणे अर्से सूचित केलें होतें कीं महाराजांचा चोपदार बापू पैठणकर याच्या मागून आपण लवकरच जाऊं. त्याचप्रमाणे पुढें फाल्गुन वद्य प्रतिपदेस बोलतां बोलतां श्रीवुवासाहेबांच्या जाण्याचा उल्लेख करून महाराजांनी १५।१५ वर्षांचे बरोबर तुकडे तोडलें" असे म्हणालें होतें. प्रस्तुत लेखकाबरोबर बोलतांना तर आतां थोड़ें दिवस असल्याचे अनेक प्रकाराने त्यांच्या बोल- ण्यांत येई आणि शेवटच्या एकदोन वर्षांतील त्यांचे एकंदर वर्तनही “ चारी 'दोन्ही कामें | सारूनिया भ्रमें। आपुलिया व ! राहूं आतां ॥ १ ॥ अथवा " आतां दिवस चारी | खेळी मेळीं ॥” अशाच तऱ्हेचें असून त्यांत कमालीची सौम्यता आलेली होती. सन १९९६ साली गणेशखिंडीचे पुजारी गाणपत्य उर्फ सांवळ्या हे काशीयात्रेस जावयास निघाले असतां निरोप घ्यावयास आले. पुनः पुनः जातो म्हणून नमस्कार करावा व जावयास निघावें तो श्री० अण्णासाहेब यांनी कांहीतरी भाषण काढावें आणि तें लांवून उभे राहण्याचा कंटाळा आळा म्हणजे त्यांनी खाली बसावें असें २ । ४ वेळां झालें. शेवटी आतां जावयाचेंच असा निर्धार करून त्यांनी पायांवर डोकें ठेविलें व झट्कन उठून वाटेस लागणार तोंच श्री० साहेब यांनी जमिनसि हात लावून नमस्कार केला. तेव्हां अति होऊन गाणपत्यांनी “ आज असें कां" म्हणून प्रश्न केला. त्यावर असेंच ’ म्हणून श्री॰ अण्णासाहेबांनी ये म्हणून त्यांना सांगितले. त्या अण्णा- विस्मित “ आतां 66