Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अखेर. १५५ क्षण जोम व तरतरी येई व त्यांच्याबरोबर चालणे चांगल्या धनधाकट माण- सासहि थकवा आणीत असे. परंतु एकदां तो अवतार संपवून ते गादीवर आले म्हणजे मात्र थकून गेल्यासारखे दिसत आणि ही गोष्ट लक्षांत येऊन त्यांच्या निकट संबंधांत असलेल्या कित्येकांस मात्र आतां हें चरित्र बहुतेक संपत आले असावें अशी धास्ती वाटत होती. परंतु त्यांच्या विलक्षण निग्रही- पणामुळे इतर कोणाच्या हॅ फारसें लक्षांत आलें नाहीं, आणि त्यामुळे त्यांचे जाणे अगदी आकस्मिक भासून त्या संबंधानें ज्याला त्याला आपापल्या परीने तर्क करण्यास सवड झाली. त्यांतीलच वस्तुतः त्यांना जावयाचे नव्हतें, परंतु लंघनानें शरीर क्षीण होऊन आटोक्यांत राहिले नाही व नाइलाज म्हणून त्यांस जावें लागले हा होय. या तकीची प्रतिष्ठितता त्यांच्या नियाणाची हकीकत पुढे स्वतंत्रच द्यावयाची आहे त्यावरून दिसून येईल.