निर्याण. इति ज्ञात्वा तत्त्वं रहसि कृतवानद्भुतमिमम् क्रतुं स्वस्वं हुत्वा प्रखरतपसां हव्यवहने । भवत्वैश्वर्य तत् पुनरिति यथापूर्वमचलं पृथग्देहं त्यक्त्वा स्वजनमविशत् यक्षपुरुषः ॥ श्री० अण्णासाहेबांसारख्या सुदृढ शरीराच्या, निकोप प्रकृतीच्या व कड- कीत तपाचरणाच्या मानाने पाहिले तर सत्तर वर्षे म्हणजे कांही फार नव्हेत. त्यांच्याहि मानानें अधिक जगलेले सुरेंद्रनाथासारखे त्यांच्या साधारण बरो- बरीचे केक लोक आहेत हे खरे आहे. तरी पण श्री० अण्णासाहेब यांचे अव सान अगदींच लवकर झाले असे म्हणतां येत नाहीं. मागें सांगितल्याप्रमाणे अतिश्रमानें वगैरे त्यांचें शरीर हळू हळू थकतच आले होते. त्यांनी प्रायोप वेशन करून हट्टानें देह ठेविला अथवा प्रायोपवेशन करीत असतां आवांक्या- बाहेर क्षीणता येऊन त्यास जावें लागलें अथवा कांही लोकांच्या कल्पनेप्रमाणे त्यांस प्लेग होऊन आकस्मिक मृत्यु आला, परंतु संबंधी लोकांनी प्लेगची गोष्ट दावून टाकून कोणाचे नजरेस येऊं दिली नाही किंवा अशाच तऱ्हेच्या आणखीहि ज्या कित्येक कल्पना आमच्या ऐकण्यांत आल्या आहेत त्यांत याकिचित देखील सत्यांश नाहीं. नैसर्गिक क्रमानें अथवा परमात्म्याचे इच्छेनुरूप त्यांची आयुमर्यादाच ती ठरलेली होती हैं त्यांस पूर्वीपासूनच ठाऊक असावें अमें अनुमान करण्यास पुष्कळ कारणे आहेत. पूर्वी महाराजांनी शरीर ठेविलें त्या वेळेस लोकांस त्याची कल्पना आल्या मुळे त्यांना विलक्षण त्रास झाला. यावरून धडा घेऊन स्वतः पुरता हा त्रास टाळण्याची खबरदारी घेण्यास तें चुकलें नाहींत शरीर ठेवण्यापूर्वी अत्यंत निर्मळ व शुद्ध स्थितींत ते ठेवावें म्हणून त्यांनी प्रायोपवेशन केलें. एरव्ही देखील चार चार दिवस ते तसेंच रहात असत; त्यामुळे त्यांचा हा हेतु कोणाच्या लक्षांत येणे शक्य नव्हतें. लोकमान्यांनी " हें प्रायोपवेशन आहे "
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७८
Appearance