Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ पुढील आयुष्य. वण श्री० अण्णासाहेब पुष्कळ वेळा काढीत. दुखणे जडून विकोपासही गेलें. तरी देखील श्री० अण्णासाहेब यांस त्याचा पत्ताही नव्हता. व ज्या वेळेस त्यांच्या लक्षांत आले त्यावेळी तर त्या अत्यवस्थ होऊन अंथरुणास खिळल्या. त्यामुळे औषधोपचार न चालून झिजत जाऊन हळूहळू इ. स. १९०९च्या आषाढांत त्यांचें देहावसान झाले. त्यांभ दोन अपत्यें होतीं. पैकीं वडील माई ही त्यानंतर तीनच वर्षानें म्हणजे १९१३ साली व लहान बागलु ऊर्फ टग्या हा १९१३ सालीं अशीं थोड्या थोड्या अंतरानें निवर्तलीं बागलूच्या मृत्यु- नंतर सुमारें वर्षा सव्वा वर्षानेंच त्यांच्यावर एकनिष्ठेनें प्रेम करणारा त्यांच्या बहिणीचा नातू म्हणजे वाभन दातीर हाहि निवर्तला. या सर्व काळांत श्री अण्णासाहेब यांची ठळक ठळक कामे आटोपत येऊन औषधें सांगणें व अनेक प्रकारच्या निमित्तांनी त्यांच्याकडे येणाऱ्या शेकडों व्यक्तीशी तितक्या तन्हांनी बोलणे यांतच त्यांचा वेळ अधिक जाऊं लागला. यामुळेच त्यांना २४ तासांतून एकाद्या तासाचीही फुरसत मिळणें अगर्दी अशक्य झाले. १९१४ सालापासून तर ते जास्त थकल्यासारखे व रोड दिसूं लागले. मात्र मनाचा उत्साह आणि शरीरेंद्रियांची तरतरी ही तर उलट अशी वाढलेली दिसे कीं, जसा कांही त्यांना अंतच नव्हता. एवढाच फरक झाला होता की, त्यांचे स्वतःचे म्हणणे वगरें जीं कामें होतीं तीं मात्र ते पूर्वी • सारखे तक्याशी बसून न करितां बहुतेक सर्व वेळ बिछान्यावर पडूनच उर कीत असत. उभे राहून एकदां सुरुवात झाली म्हणजे त्यांच्या अंगांत विल- व पास देण्याचं काम होतें त्याने स्वतःच्या इच्छेनेंही एकादें नांव त्यांत अधिक घातले असतां कांहीं वावगे नव्हते. त्यावेळी हें काम एका मुसलमान गृहस्थाकडे होतें; आणि तो संगमावर कोठें राहतो हैं श्रीअण्णासाहेब यांस माहीत होतें. त्या गृहस्थाचा पत्ता सांगून त्याच्याकडे जावयास सुचविलें व “ तुम्ही श्रीमंत आहां, कोणाचाही स्नेह संपादणें तुम्हास कठीण नाहीं, तेव्हां त्या गृहस्थाकडून काम करून घ्या. " असे सांगून त्याची रवानगी श्रीअण्णा- साहेबांनी करून दिली. तेव्हां त्या गृहस्थालाही स्वर्ग हाती आल्यासारखे झाले व हर्षानें श्रीअण्णासाहेबांचें पायांवर डोके ठेवून तो आपले उद्योगांस नघून गेला.