पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ पुढील आयुष्य. चतुर्थीव्रत श्रीगजाननास दुर्वा वाहणे वगैरे नियमही ते मोठ्या आदराने पाळीत असत. जवळजवळ तितकाच आदर अण्णासाहेब यांच्याविषयी त्यांना वाटत असे, असे म्हणण्यास हरकत नाहीं. जोशीवुवा राष्ट्रीयपक्षास येऊन मिळाल्यामुळे त्या पक्षास एक मोठाच लाभ झाला व त्यानंतर झालेल्या म्युनिसिपल निवडणुकीत अण्णासाहेव व जोशी हे दोघेही बरोवरच उभे राहिले होते. पुष्कळ वर्षांपासून अण्णासाहेब हे उभे राहत असत, सर्वांत अधिक मतें पडून नियमानें निवडूनही येत असत; त्यांना कधीं खटपट करावी लागली नाहीं, किंवा कधीं कोणास मत द्या, म्हणून त्यांनी एका शब्दानेही म्हटले नाहीं. त्यांच्या नांवाची सुपारी काढूनच ठेवावी लागे म्हणून रा. केळकरांनी लिहिलेंच आहे. हा क्रम बारा सालच्या निवडणुकीपर्यंत चालू होता. पुढे मात्र मत देण्याच्या अधिकाराचें क्षेत्र वाढविण्यांत आल्यावरून म्युनिसिपालिटी- मध्ये काम करण्य त राम नाही, असे पाहून त्यांनी उभे राहण्याचं सोडलें. निवडून आल्यावरही शिक्षण खातें आपल्याकडे घ्यावयाचें, असे त्यांचे ठरलेले असे, व तें काम ते नेहमींच्या पद्धतीप्रमाणे अतिशय नियमानें करीत असत. ठरा- विक दिवशी ठरलेल्या शाळा तपासावयास जावयाचें वगैरे त्यांचे नियम ठरलेले होते. या कामाकरितां म्युनिसिपालिटीतून त्यांना टांगा असे. परंतु त्याचा उप- योग ते फक्त म्युनिसिपालिटीच्या कामाकडेच करीत. त्या टांग्यांतून एका दें खाजगी काम करण्याकरितां ते कधींही गेले नाहीत. त्यांस देवदर्शनास वगैरे जावें लागे, व क्रित्येक वेळां असे होई की, जी शाळा तपासावयाची, तिच्या- जवळ त्यांचें नित्य दर्शनाचे एकादें देवनंदिर असे, अथवा ज्यास जरूर भेटा- वयाचे आहे, असा कोणी तरी गृहस्थ राहात असे; अशा वेळी कामांत काम म्हणून तपासणें व देवदर्शन अगर त्या गृहस्थास भेटणे, अशी कामे त्यांनी बरोबर कधींच करूं नयेत. अशा वेळी ते घरी परत येत व पुन्हा देवदर्शना- करितां मुद्दाम जात | यांच्या कारकीर्दीत पगार, रजा व इतरही कित्येक सोई या दृष्टीनें गरीब मास्तर लोकांस फार सुख झाले, यांत संशय नाहीं. विशेषतः प्लेगच्या दिवसांत काम नसतां भर पगार मिळू नये अशा कल्पना निघाल्या असतां त्या खोडून टाकून अण्णासाहेब यांनी मास्तर लोकांची