पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचा व अण्णासाहेब यांचा स्नेह. १४७ ( योग्य नाहीं, अशा सद्बुद्धीने त्यांनीं ' वर येऊं दे' म्हणून सांगितलें इतके ते सांगत आहेत तोंच अण्णासाहेवही वर येऊन पोहोंचले, व त्यांनी ' कां जोशीबुवा, कसे काय आहे ? ' म्हणून विचारले. त्यावर त्यांनी तुम्ही आलांतच, नाहीतर मी तुमचें तोंडही न पाहण्याचा निश्चय केला होता, ' म्हणून स्पष्टपणे सांगितले. ' म्हणूनच तर मी आलो आहे ' असे सांगून अण्णासाहेवही बसले, व त्यांनी आपल्या त्या दिवशीच्या वर्त- नाचा खुलासा करून जोशीबुवांचीं विधानें कशीं चुकीचा होतीं, ती त्यांनी त्यावेळी करणें कसें इष्ट नव्हतें, व दुसरा मार्ग नसल्यामुळे आपणास त्यांचा अपमान कसा करावा लागला, वगैरे समजून सांगून ब्रिटिश राज्य पद्धति व राजनीति आणि ब्रिटिश राष्ट्र यांचे अंतरंग सप्रमाण उघडें करून दाखविलें. दोघांचेही पुष्कळ तासपर्यंत भाषण झालें, व त्या वेळेपासून जोशी- बुवांनी मवाळ पक्षास सोडचिठ्ठी दिली. एकदां समजूत पटल्यावर त्यांच्या मनांतील सारा राग नाहीसा झाला व अण्णासाहेब यांच्याशी ते अशा स्नेहाने वागूं लागले कीं, त्या दिवशींच्या प्रकारानंतर " हें असे काय झाले " म्हणून सर्वांसच आश्चर्य वाटले. सहवासानें अण्णासाहेब यांचे खरें स्वरूप हळु हळु जोशीवुवांस समजून आले व पुढे पुढे तर त्यांचा आदर इतका वाढला की लहानसान गोष्टीत देखील एकाद्या लहान मुलासारखे सरळपणानें नुसतें तुम्हीं एकदां हैं पहा तरी, ' असें म्हणून त्यांना दाखविल्याखेरीज त्यांनी एकही गोष्ट केली नाहीं. एकादी साधी चार शब्दांची तार लिहून त्यांनी यांना दाखविण्यास आणावी, व कित्येक वेळां असे देखील व्हावें कीं, अण्णासाहेब वर कामांत असल्यामुळे त्यांनी खाली झोपाळ्यावर मुकाट्यानें बसून रहावें. दुसरें कोणी वर्दी द्यावयास जाऊं लागलें तरी देखील, 'छे, छे, त्यांना त्रास देऊं नका, मी आपला बसतों,' म्हणून त्यास जाऊं देऊं नये. अण्णासाहेब यांनी म्हणावें 'अहो जोशीबुवा, तुम्हींच ना लिहिली तार ती ? मग मीं तें काय पाहणार आशखी ? या पाठवून तशीच. त्यावर

  • पाठवतों मीं, पण तुम्हीं आपले पहा एकदां नुसतें, ' असा एकाद्या लहान

पोरासारखा त्यांनी हट्ट धरावा, व अण्णासाहेब यांनी एकदां ती वाचून • ठीक आहे' असे म्हटले, म्हणजे त्यांचें समाधान व्हावें, व मग त्यांनी ती पाठवून द्यावी. जोशीबुवांची उपास्य देवताही श्रीगजाननच होती, व " ,