Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक गमतदार गोष्ट. पाठ राखिली. म्युनिसिपालिटीत काम करीत असतांनाच्या गमतीदार गोष्टी ते केव्हां केव्हां सांगत असत. एकदां एक मास्तर यांच्याकडे आला, व दोनतीन दिवसांची किरकोळ रजा मागू लागला. त्यानें नुकतीच रजा घेतली असल्यामुळे 'तुला पुन्हा कशाकरितां रजा पाहिजे ? ' म्हणून यांनी विचारले. तेव्हां ' कांही घरगुतीबाबींसंबंधानें मी अतिशय अडचणीत आहे, म्हणून त्याने सांगितले. अण्णासाहेब यांची गोष्ट अशी होती की, कोणी दुःखी, कष्टी, लासलेला मनुष्य पाहिला म्हणजे, कांही तरी निमित्तानें ते त्याच्याशी बोलत बसत, च तेवढ्यापुरतें तरी तो आपणास विसरून जाऊन आनंदित होत असे. यांच्या भाषणाची अशी खुबी असे की, यांच्यासमोर अधिक उणा शब्द बोलण्याची तर कधींच कुणाची हिम्मत झाली नाही, इतकेच नव्हे, तर एक प्रकारची मोठी भीति वाटत असे. परंतु ५११० मिनिटें भाषणाचा प्रसंग घडला कीं, लागलींच मर्यादा न सुटतां दुसऱ्या मनुष्याच्या मनावरचा ताण निघून जाई, व एकाद्या जिव्हाळ्याच्या वडील माणसाजवळ आपल्या मनांतील गोष्टी ओकाव्या, त्याप्रमाणे अतिशय मोकळ्या मनानें व आपलेपणानें आपले हृद्रत तो सांगत असे. अशा वेळी आपण एकाद्या थोर विभूतीच्या पुढे बसलो आहों हेंहि तो विसरून जाई, व केवळ मनाचा मोकळेपणा मात्र राही. त्याचप्रमाणे थोड्याच वेळांत त्या मास्तरचीही वृत्ति खुलली व डोळ्यांत पाणी आणून तो सांगू लागला कीं, “ काय करावें ? माझ्या मागें संसारांत एक मोठाच त्रास आहे. मी स्वतः मास्तर आहे, व बायकोही एका शाळेत मास्तरीण आहे. ती चार इयत्ता शिकलेली. एरव्हीं चांगली आहे, पण तिची मिजास मोठी. एरव्ही तर निभून जातें, पण चार दिवस पाळांचे आले, म्हणजे फार त्रास पडतो. तिला तर वेळेवर शाळेला जावें लागतें, व स्वयंपाकाचे काम माझेवर पड़तें. मी स्वतः अलीकडे दुखणाईत असल्यामुळे अतिशय त्रास होतो; परंतु त्याला काय करावयाचें ? आम्हीं गरीब माणसे पडलों; हे असेच चालावयाचें !” त्यावरून अण्णासाहेब यांनी त्याच्या कुटुंब स्थितीची बारीक चौकशी केली व त्याची बायको ज्या शाळेत होती तिचा नंबर विचारून घेतला आणि त्याला औषध सांगून रवाना केलें. त्या दिवशीं शुक्रवार होता, तो