पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील आयुष्य. दोघांत विशेष संबंध असणे शक्य नव्हते. परंत एका लहानशा गोष्टीमुळे असा विशेष संबंध पडून जोशीदोवा यांची अण्णासाहेबांवर भक्ति बसली, व उरलेल्या थोड्याशा आयुष्यांत ते अण्णासाहेबांचे एकनिष्ठ भक्त होते. हा प्रसंग असा झालाः - सार्वजनिक सभेच्या दिवाणखान्यांत एका बैठकींत कांहीं वाद निघाला होता. जोशीबुवा यांस, अर्थशास्त्र वगैरे दृष्टीनें राज्यपद्धतिंत अन्याय वाटत होतेच. 'तरी ब्रिटिश राजा व राज्यकर्ते यांच्या ठिकाणी इतका चांगुलपणा असूनही ब्रिटिश राज्यपद्धति व राजनीतिचें अंतरंग अगर्दी निराळे आहे' अशी दृष्टि आलेली नव्हती. कारण त्यांच्या निर्मळ मनाला मनुष्याचा वाईट हेतु दिसत नसे. त्यामुळे दादाच्या भरांत कांहीं विधानें ते करूं लागले. तशीं तीं पुढें येणें, ज्या कामाकरितां तो वाद चालला होता, त्याच्या दृष्टीनें पथ्य नसल्याकारणाने त्यांचें तोंड बंद करणे जरूर होतें. जोशीबुवांसारखा मनुष्य दोन शब्दांत उमजणारा नव्हता. व दोनचार तास त्यांच्याशी बोलून त्यांची खात्री पटवून देण्यास तर तेथें सवड नव्हती; अशा वेळी यांना गप्प कसे बसवावें, असा विचार पडला. तेव्हां अण्णासाहेब यांनी एका साध्या युक्तीचा उपयोग केला. दुसरे तिसरें कांहीं न करितां गप्प बसाहो जाशीबुवा. तुम्हाला कांहीं समजत नाहीं. " असें अण्णासाहेबांनी घडवून सांगितलें ! त्यासरशी जोशी- बुवांस तर धक्का बसलाच, पण इतर मंडळीही थिजून गेली ऐवज दुसरा कोणी असता, तर त्याचें तेथल्यातेथेंच वाभाडे निघाले असते. परंतु अण्णासाहेबांचे वजनच इतकें जबरदस्त होतें कीं कोणासही जास्त कांहीं बोलण्याची हिम्मत झाली नाहीं. परंतु अण्णासाहेब यांनी हे काय केले, असे सर्वासच वाटल्यावांचून राहिले नाहीं. स्वतः जोशीबुवा तर अतीशयच तापून गेले, परंतु पुढे एक अक्षरही न बोलतां ते घरीं गेले. या गोष्टीस २ । ४ दिवस गेल्या- वर एक दिवस जोशीबुवा आपल्या घरी एकटेच बसले असतां अण्णा- साहेब भेटावयास आले आहेत म्हणून त्यांना कळले. त्यासरशी पहिला विचार ' भेट घेत नाहीं' असे चक्क सांगून त्यांस वाटेस लावावें, असा आला. परंतु कांही झाले तरी एवढा मोठा मनुष्य, व आजपर्यंत कध घरीं न आलेला आपल्या पायानें घरीं आला आहे, त्यास हांकून लावणें 6" त्यांच्या