Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुरत कांग्रेस. १४१ 2 पुण्याच्या स्टेशनवर अमीरास उतरविण्याची सारी तयारी असून खडकीवरच त्यास उतरून घेण्यांत आले. आणि मोटारीतून परभारें छावणीकडे त्याची रवानगी झाली ! त्याच्यानंतर सार्वजनिक सभेचे मानपत्र पोष्टानें त्यास पाठवि- ण्यांत आले, व त्याचा साभार स्वीकार केल्याचें अमीराकडूनही रीतसर पत्र आले. त्यानंतरही, 'यांना भेटण्याची इच्छा आहे म्हणून अमीराकडून एक. तार आली. परंतु योगायोगानें असो, अथवा कांही कारवाईने असो, तार पोहोचविणाऱ्या सोजीराचा घोटाळा झाला, व पटवर्धनांची पुण्यांतील इतर घरें धुंडून रात्रीच्या अडनाडया वेळी त्याने ती अण्णासाहेबांस आणून दिली. त्यावेळी कितीही त्वरा केली तरी ठराविक वेळी भेट घेणे शक्य नव्हतें. म्हणून सरते शेवटी ती कल्पना वांया गेली. ही कल्पना काय असावी हें सांगणे कठीण आहे. तरी एवढे मात्र खास की एवढ्या मोठ्या प्रस्थांनी उपस्थित केलेली कल्पनाही तशीच कांहीतरी जबरदस्त असली पाहिजे. ही केवळ लोकवार्ता अथवा दंतकथाही नाही. खुद्द अण्णासाहेबांनी स्वतःच ही गोष्ट सांगितली व त्यावर त्यावेळी कावुलांत गेला असतां तर महाराजांच्या उत्सवांचे कसें केले असतें ? " असा प्रश्नही त्यांना विचा- रला होता. असो. 66 यानंतर पुढे लागलीच सुरतची प्रसिद्ध काँग्रेस झाली. या काँग्रेसमध्ये कांहीं- तरी तंटा होणारच, असा अंदाज असल्यामुळे अण्णासाहेबांचेंही तिच्याकडे थोडे जास्त लक्ष लागले होतें, व जरी ते स्वतः काँग्रेसला गेले नाहीत, तरी आपल्याकडे येणाऱ्या लोकांत तिच्यासंबंधानें उत्साह उत्पन्न करून आणि कित्येकांना तर जाण्याचाही अगदर्दी आग्रह करून, त्यांनी बरीच मदत केली. सुरतच्या काँग्रेसनंतर सुप्रसिद्ध अरविंद बाबूंची स्वारी पुण्यास आली होती. त्यावेळी गायकवाड वाड्यांत त्यांची व यांचीं गांठही पडली होती. बंगाली लोकांची बुद्धिमत्ता व कर्तृत्व वगैरेंच्याविषयीं जरी आण्णासाहेब यांचें मत चांगले होतें तरी देखील त्यांच्यांत दिखाऊपणा फार असून पाश्चात्य पगडा त्यांच्यावर ज्यास्त असल्याकारणाने त्यांच्या सर्व गोष्टींत मूळ वैदिक कल्पनांचे भाव उमरत नाहीत असे त्यांचें मत होतें. महाराष्ट्रांच्या बाहेरील प्रसिद्ध लोकांपैकीं स्वामी विवेकानंद, अरविंद घोष, आणि महात्मा गांधी या तिघांसही आण्णासाहेब यांनी पाहिले होतें, व थोडेबहुत भाप