पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ पुढील आयुष्य. प्रसंगही झाले होते. पैकीं म० गांधी यांस “चांगला, परंतु अखेरीस शाम- ळोच, " म्हणुन त्यांनी शेरा देऊन ठेवला होता. विवेकानंद यांची कामगिरी व मर्दपणा ही त्यांना आवडत, परंतु हिंदुस्थानची राष्ट्रीय उन्नति अमेरिकेतील पैशावर घडवून आणावी, ही त्याची कल्पना त्यांना इतकी मूर्खपणाची वाटे की सौम्यपणानें ते त्याला नेहमी 'खुळा' म्हणुन म्हणत असत; आणि त्याचें कारण एवढेच असावें कीं, पाश्चात्य संस्कृतीचा झगझगाट डोक्यांत थोडा तरी शिल्लक असल्यामुळे त्यांना त्या लोकांची खरी 'प्रकृति' केव्हांच समजली नाहीं. सन १९१२ साली Myron Felps या अमेरिकन गृहस्थाबरोबर झालेल्या भाषणांत अखेरीस त्याच्याच तोंडून अण्णासाहेब यांनी या गोष्टी वदवून घेतल्या. खुद्द विवेकानंद यांची कल्पना फोल ठरून अमेरिकेंतून त्यांना हवा तो पैसा मिळाला नाहीं, व त्यांनी उत्पन्न केलेल्या संस्था या 'मिलिटंट हिंदु- इझम' ची उपज करणारे कारखाने होण्याऐवजी सोशल सर्व्हिस आणि पुस्तक प्रकाशन यांच्या मर्यादित क्षेत्रांतच पडून राहिल्या, हें पाहिलें, व त्यांच्या खुद्द पट्ट शिष्यिणनेंच “स्वामींची कल्पनाच चुकीची होती, कां तें काम त्यांच्याकडे नव्हते ?” असा प्रश्न उपस्थित केलेला पाहिला, म्हणजे हा शेरा किता सार्थ होता, हें दिसून येईल. अरविंदवावूविषयीं असे स्पष्ट मत त्यांचे- कडून ऐकण्याचा कधीं प्रसंग आला नाही. परंतु एकंदरींत या दोघांच्या मानानें अरविंदाविषयीं त्यांचे मत ज्यास्त अनुकूळ असावेसे वाटते.

  • Was his life indeed & failure, as he was some-

times tempted to feel it, since there never came to his hands that " twenty million pounds" with which, as he used to say, he could have set India on her feet ? Or were there higher laws at work, that would eventually make a far greater success than any that could have been gathered within & single lifetime ? Master as I saw him.' P.57,