पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुढील आयुष्य. कोणच्याही कां निमित्तानें होईना आईस व चुलत्यास पोराच्या लग्नाची हौस न पुरतांच जावें लागलें, व स्वतः बाबाही लग्नाचे विचार सोडून इराण किंवा खाल्डियासारख्या एकाद्या ठिकाणी, पुराणवस्तुसंशोधनासारख्या आपल्या आवडत्या विषयाचा अभ्यास करण्याकरितां जावयाचा विचार करूं लागले. तेव्हां कुठें लग्नाचा विचार यांचे डोक्यांत आला व त्याप्रमाणे सांगून आलेल्या • एका मुलीला त्यांनी रुकारही दिला. 'तुझे लग्न ठरवीत आहे,' असे त्यांनी . बाबाला स्वतःच सांगितले. परंतु काही कारणानें तें लांबून त्यावेळी न होतां एका वर्षानें झालें. १४० मध्यंतरीच्या काळांत स्वदेशी चळवळीला ऊत येऊन सुरत काँग्रेस वगैरे प्रकरणे झालीं व त्यामुळे व्याख्यानें व सभा यांनाही ऊत आला. त्यांतील मोठमोठ्या गोष्टीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीनें यांचाही संबंध येऊन व्यापही वाढत गेला. त्यामुळे दोन दोन चार चार दिवसांत खाण्यासही फुर- सत मिळू नये, अशी स्थिति झाली ! याच सुमारास कांहींतरी राजकीय मस- • लती उभारण्याच्या त्यांच्या जन्मजात स्वभावानें पुन्हा थोडी उचल खाऊन, परदेशगमनाचाही एक योग आला होता. परंतु दयालु सरकारच्या धोर- •णानें तोही वांया गेला. त्याची साद्यंत हकीकत कळणे अशक्य आहे; परंतु लोकमान्यांनी व यांनी अफगाणिस्तानांत जावें, आणि शिक्षणविषयक कांहीतरी प्रोपगांडा तेथे सुरू करावा, असे त्याचे दृश्य स्वरूप होतें. या वर्षी अफगा- "णिस्थानच्या माजी अमीरांची स्वारी हिंदुस्तानच्या प्रवासास आली होती. मुंबईस येऊन अशा रीतीने का होईना, या अवदालीच्या वंशजाने पुण्यास आपले पाय लावले. कालाच्या अघटित घटनेनुसार पुण्याच्या लोकांनीही त्याला मानपत्र द्यावयाचे ठरविलें होतें. सार्वजनिकसभेच्या मार्फतच तें दिलें जाव- याचे होते आणि तें काम अण्णासाहेब व लो. टिळक यांच्याचकडे होतें. मानपत्र अर्पण केल्यावर अमीराशी कांही खाजगी भाषण करावें, आणि त्यांत जर आंकडे पटले, तर पुढील कार्यक्रमाकरितां स्वतः अण्णासाहेबांनी व लो० टिळ- कांनी काबुलास जावें अशी एकंदर योजना होती. त्याप्रमाणें, हिंदुस्तानच्या या दोस्ताचें स्वागत करण्याकरितां लो० टिळक, अण्णासाहेब व इतर नागरिकही हारतुऱ्यांचा पाट्या घेऊन मारे स्टेशनवर गोळा झाले. परंतु पुण्याच्या लोकांची आणि अमीराची अशी प्रत्यक्ष गांठ घालून देणें सरकारला कोठून आवडणार ?