Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुण्यांतील प्लेग. १२७ पुण्याचा पहिला प्लेग ही नुसत्या पुण्यावरच नव्हें, तर सर्व महाराष्ट्रावर आलेली राष्ट्रीय आपत्ति होती असे म्हणण्यास हरकत नाही. कारण या प्लेगनें अतिशय नुकसान असे केले की, त्या वेळच्या उगवत्या पिढीतील अतिशय जोमदार आणि होतकरू तरूण पुरुष खड्यासारखे उचलून नेले, आणि त्यामुळे प्लेगच्या मागून पुढे येणारी पिढी आणि पूर्वीची पिढी यांतील दुवा नाहींसा होऊन या दोन काळांतील पुणे म्हणजे, 'हे चित्र पहा, ' आणि ' हे चित्र पहा, ' असे नमुनेदार होऊन गेलें. " १ प्लेगनें घातलेल्या या गदारोळांत अण्णासाहेब यांस त्यावेळी तरी कांहीं तडाखा बसला नाही. मात्र त्यांना स्वतःला आणि कुटुंबालाही थोडीशी खंडणी द्यावी लागली. कुटुंबास प्लेग झाला, त्या वेळेस तपासणीचा धुमधडाका चालू होता. ' मी बागेतून आलों तो आमची ही ( कुटुंब) सोप्यांत होती, तिचा चेहरा तांबडालाल झालेला पाहून चौकशी केली, तो ताप आलेला आहे. म्हणून कळून आलें. तपासणीची तर वेळ झालेली, काय करावें, असा विचार पडला. परंतु तिच्या तें गांवीही नव्हतें. तशाच स्थितीत ती तांदूळ घेऊन सडावयास बसली, तोंच डॉक्टरीण आली; परंतु हिला कांडतांना पाहून तिला काहींच शंका आली नाही. ती अंगास हातही न लावतां मुका- ट्यानें निघून गेली. पुढे दोन तीन दिवस याच युक्तीनें वेळ निभून गेली, ' असे त्यांनी एकदां सांगितले. स्वतः यांनाही केव्हां तरी त्याच सुमारास प्लेग झाला. गवत्या मारुती- समोर कांहीं काम होतें तें करून “ टांग्यांत बसतो तोंच पाठींतून जोराचा रेप आला. त्यावरोवरच मीं समजलों की महाराजांची स्वारी आली आहे. दुसरी आणखी एक दोन कामें होतीं तीं करून घरी येऊन पोहोंचतों तो अंगांत सडकून ताप भरला, व जांघेत गांठ येऊन सपाटून दुखूं लागले. अशा स्थितीत एक दिवस काढला शेवटीं संध्याकाळीं, जे काय होईल तें होवो, असा विचार करून नेहमीप्रमाणे डोक्यांस उपरणे गुंडाळलें, आणि तसाच लंगडत लंगडत गणपतीस गेलों. अतीशय कष्टानें तेथे जाऊन पोहों- चल्यावर तशाच प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे त्या पुयाही केल्या, व तसाच घरी येऊन पडलों. कांहीं वेळानें म्हणजे सुमारे दोन अडींच वाजतां रात्रीं लघवीस झालें, आणि जवळजवळ लहानशीं घागरभर