पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ पुढील आयुष्य. कीं, या सर्व प्रकरणांत अतीशय महत्त्वाची अशी योजना अण्णासाहेब यांनी सांगितलेली असे, हें पुण्यांतील लोकांस तरी निर्विवाद ठाऊक आहे. पुण्यांतील काँग्रेसनंतर पुढें लौकरच प्लेगची घामधूम सुरू झाली, व तेथून पुण्यामधे दुसरेंच मन्वंतर सुरूं झालें. प्लेगचे दिवस पुण्यांतील लोकांस कसे · गेले, सॅनिटेशनच्या नांवाखाली सोजरांनी पुण्यास काय काय प्रकार केले, वगैरे • सर्व मनोरंजक हकीगती प्रसिद्धच आहेत. अण्णासाहेब यांसही हे दिवस अति- शय वाईट गेले असावेत. प्लेगच्या दिवसांत पुण्यांतील लोक बाहेर जाऊन रहा- वयास लागले, तेव्हां प्रथमतः लोकाचाराप्रमाणें अण्णासाहेब यांनींही झोपडीची व्यवस्था करून, एक दिवस आपली मंडळी रवाना करून दिली, व आपण स्वतः घरींच राहिले; कारण देव घरी होते. देवांस हलवावें अगर तेथेंच ठेवून जावें, ही गोष्ट त्यांच्या हातून घडणारी नव्हती, म्हणून अखेरीस .मंडळी परत घरी आली, व तेथपासून पुढे केवढाही लेग असला तरी हे आपली मंडळी हालवीत नसत. प्लेगच्या दिवसांत तपासणीचा वगैरे त्रास इतर लोकांप्रमाणे यांनाही व्हाव- याचाच, परंतु यांच्या वजनामुळे व युक्तीमुळे तो शक्य तेवढा कमी झाला. घर तपासावयास सोल्जर लोक आले, म्हणजे, यांनी त्यांच्याशी त्यांच्याच •सारखें गांवढळ इंग्रजीत बोलावें; म्हणजे ते फारसा त्रास न देतां निघून जात. 'प्लेगच्या तपासणीच्या वेळीं देखील महाराजांच्या कृपेनें देवघरांत सोल्जरांनी कवीं पाऊल घातलें नाहीं, बाहेरूनच डोंकावीत असत, " असे ते मोठ्या समा- धानाने सांगत असत. प्लेगच्या तपासणीच्या नांवाबाली सोल्जरांनी लोकांची घरें धुवून काढली, व चुलीखाली उकरून पाहण्यापर्यंत नासधूस केली, याचें कारण त्या लोकांशी झालेल्या कांहीं बोलण्यावरूनच असो, किंवा दुसऱ्या कांही - कारणांनी असो, ते असे सांगत कीं, 'सरकारास पुष्कळ दिवसांचा भ्रम होता कीं, पुण्यांतील लोकांपाशीं शस्त्रांचा गुप्त संग्रह आहे; पुण्यांतील लोक जणूं कांही सदैव बंडाच्याच तयारीत असतात, असा हास्यास्पद भाव सरकार मनांत बाळगतें, हें प्रसिद्धच आहे. असल्या भयंकर लोकांविषयींचा भ्रम फेडून घेण्याची संघी प्लेगच्या निमित्ताने त्यांनी साधली. त्यांत त्यांना काय मिळाले, हे सांगणे कठीण आहे, पण सोल्जर लोकांचा चिरिमिरीचा फायदा मात्र बराच झाला असेल !